Mira Rajput Photos: लग्जरी फॅशन ब्रॅंड Dior ने काही दिवसांपूर्वी मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाला पहिल्यांदाच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यात बॉलीवूडपासून ते फॅशन जगतातील प्रसिद्ध लोकांनी हजेरी लावली होती. यामध्ये, शाहिद कपूर ची पत्नी मीरा राजपूत ने आपल्या स्टाईलीश लुकने लोकांचे लक्ष वेधून घेतले. तीने साधा ड्रेस परिधान केला होता, मात्र त्यावर तीने घातलेली एक्ससरीज लाखो रुपयांची होती. या स्टार-स्टडीड इव्हेंट मध्ये मीरा खूप वेगळी आणि आकर्षक दिसून येत होती. मीराने तिच्या या शानदार लुक चा फोटोशूट देखील केला होता, यात तीने दिलेल्या पोज आणि एक्सप्रेशन बघण्याजोगे होते. (Mira Rajput looks stunning in black slit outfit which cost too much for dior)
अधिक वाचा : रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे फायदे कमी आणि तोटेच जास्त!
शाहिद कपूर ची पत्नी मीरा राजपूत या इव्हेंटमध्ये एकटीच पोहोचली होती. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती लोकांचे लक्ष वेधून घेत होती. तिच्या या ड्रेसच्या साइडला स्लिट दिला होता, ज्याला बटणाचे दिलेले डिटेल्स खूप शोभून दिसत होते. मीरा ने हा आऊटफिट ब्लॅक शॉर्टसोबत परिधान केला होता आणि त्याला असलेल्या खिश्यामध्ये मीराने हात घातले होते. शिवाय या ड्रेसच्या स्लिट मधून मिराचे टोन्ड लेग्स देखील फ्लॉन्ट होत होते.
अधिक वाचा : सावधान ! सूर्यग्रहण बिघडवणार या राशींचे नशीब
मीराने आपला हा लुक परफेक्ट करण्यासाठी मीराने स्टेटमेंट मल्टीलेयर्ड स्ट्रिंग चोकर पर्ल नेकलेस परिधान केला होता आणि बोटात गोल्डन रिंग धारण केली होती. तसेच काळ्या रंगाची फ्लॅट सॅंडल घातली होती. मेकअपमध्ये तिने डेव्ही फाऊंडेशन, बोल्ड रेड लिप शेड, विंग्ड आयलाइनर, डार्क आयब्रोज तसेच राऊंड-ऑफ मॅसी बन केले होते.
मीराने घातलेल्या या सिल्क आणि वूल फेब्रिक ड्रेसची किंमत विचाराल तर अधिकृत वेबसाइटवर त्याची किंमत 246,600 रुपये सांगितली आहे. तसेच तीने याच ब्रँडची घेतलेली काळ्या रंगाच्या पाऊच बॅगची किंमत 225,834.26 रुपये इतकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इव्हेंटमध्ये मीराने परिधान केलेला नेकलेस सुमारे 90 हजार रुपयांचा आहे.