लवकरच मिशन मंगल पार करणार १०० कोटींचा पल्ला

बी टाऊन
Updated Aug 19, 2019 | 12:42 IST

अक्षय कुमारचा सिनेमा मिशन मंगल बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत आहे. ४ दिवसांत सिनेमा १०० कोटींच्या कल्बमध्ये जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

Mission Mangal Box office collection
चार दिवसांत मिशन मंगलची कमाई १०० कोटींच्या आसपास  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

 • मिशन मंगल सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई
 • चार दिवसांत सिनेमा १०० कोटींच्या आसपास
 • मिशन मंगलनं जॉन अब्राहमचा बाटला हाऊस सिनेमाला मागं टाकलं

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा मिशन मंगल सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाल करतोय. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी मिशन मंगल सिनेमा रिलीज झाला. पहिल्याच दिवसांपासून सिनेमानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. केवळ ४ दिवसांत या सिनेमानं १०० कोटींच्या आसपास कलेक्शन केलं. दरम्यान सोमवारी मिशन मंगल १०० कोटींचा आकडा पार नक्कीच करेल.

 

ट्रेन एनालिस्ट तरण आदर्शनं ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, मिशन मंगलनं गुरूवारी २९.१६ कोटी रूपये, शुक्रवारी १७.२८ कोटी रूपये, शनिवारी २३.५८ कोटी रूपये आणि रविवारी २७.५४ कोटी रूपयांचं कलेक्शन केलं. यानुसार आतापर्यंत मिशन मंगल या सिनेमानं ९७.५६ कोटी रूपयांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. मिशन मंगलनं जॉन अब्राहमचा बाटला हाऊस या सिनेमाला मागं टाकलं आहे. मिशन मंगल हा सिनेमा २०१९ मध्ये पहिल्या दिवशी जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

इतकंच नाही तर अक्षय एक्टेंडेंट विंकेन्ड (गुरूवार-रविवार) चा सिनेमा 2.0 आणि केसरी हून मिशन मंगल पुढे निघून गेला आहे. 2.0 ने पहिल्या विंकेन्डमध्ये ९५ कोटीची कमाई केली होती. तर केसरीनं ७८.०७ कोटी रूपयांचं बिझनेस केला होता. अक्षयचा 2.0 या सिनेमानं पाचव्या दिवशी आणि केसरीनं सातव्या दिवशी १०० कोटी रूपयांच्या क्लबमध्ये समाविष्ठ झाली होती. मिशन मंगल सुद्धा पाचव्या दिवशी १०० कोटींचा आकडा पार करणार आहे. 

मिशन मंगल हा सिनेमा मंगळ ग्रहासंदर्भातील स्पेश मिशन बाबतची खरी कहाणी आहे. सिनेमाची कहाणी मंगळ यानाच्या यशाबद्दल आधारीत आहे. स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने मंगळावर मंगळयान पाठवलं होतं. सिनेमा दाखविण्यात आले की कशा प्रकारे मिशन मंगलची सुरूवात झाली होती. तसेच कसे एक एक नायक जोडून एक खास टीम निर्माण करण्यात येते. टीममध्ये चार महिला वैज्ञानिक आहेत. त्या वेगवेगळ्या संस्कृतीतून आणि वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आल्या आहेत. या महिला एकत्र आल्यावर कशी परफेक्ट टीम तयार होते हे यात दाखविण्यात आलं आहे.

या सिनेमात अक्षय व्यतिरिक्त विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, कीर्ति कुल्हारी आणइ शर्मन जोशी लीड रोलमध्ये आहेत. सर्वांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. हा सिनेमा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. 

२०१९ साली पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे

 1. सलमान खानचा भारत: ४२.३० कोटी 
 2. अक्षय कुमारचा मिशन मंगल: २९.१६ कोटी
 3. वरूण धवनचा कलंक: २१.६० कोटी
 4. अक्षय कुमारचा केसरीः २१.०६ कोटी 
 5. शाहिद कपूरचा कबीर सिंहः २०.२१ कोटी 

अक्षय कुमारचे स्वातंत्र्य दिवशी रिलीज झालेल्या सिनेमांची कमाई

 1. रूस्तम (२०१६)- १४.११ कोटी (वर्किंग डे) 
 2. टॉयलेटः एक प्रेम कथा (२०१७) - १३.१० कोटी (वर्किंग डे) 
 3. गोल्ड (२०१७)- २५.२५ कोटी (हॉलीडे)
 4. मिशन मंगल (२०१९)- २९.१६ कोटी (हॉलीडे)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...