Pathaan vs MNS : शाहरूख खानच्या पठाणला मनसेचा विरोध

MNS opposed Pathaan movie in Maharashtra : शाहरूख खानची प्रमुख भूमिका असलेला पठाण हा हिंदी सिनेमा आज (बुधवार 25 जानेवारी 2023) प्रदर्शित झाला. पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी पठाण सिनेमा प्रदर्शित करण्याला मनसेकडून जाहीर विरोध सुरू आहे.

MNS opposed Pathaan movie in Maharashtra
शाहरूख खानच्या पठाणला मनसेचा विरोध  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शाहरूख खानच्या पठाणला मनसेचा विरोध
  • सरसकट सर्व स्क्रीन बुक करून इतर सिनेमांची अडवणूक करण्याचे धोरण
  • पठाण सिनेमाला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा विरोध

MNS opposed Pathaan movie in Maharashtra : शाहरूख खानची प्रमुख भूमिका असलेला पठाण हा हिंदी सिनेमा आज (बुधवार 25 जानेवारी 2023) प्रदर्शित झाला. पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी पठाण सिनेमा प्रदर्शित करण्याला मनसेकडून जाहीर विरोध सुरू आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पठाण सिनेमाच्या निर्मात्यांनी मल्टिप्लेक्सचे स्क्रीन मोठ्या संख्येने बुक केले आहेत. यामुळे मराठी सिनेमांना स्क्रीन मिळवणे कठीण झाले आहे. पठाण सिनेमाच्या निर्मात्यांचे वर्तन पठाणी पद्धतीचे आहे. या निर्मात्यांमुळे मराठी सिनेमाची महाराष्ट्रात गळचेपी सुरू आहे, अशा स्वरुपाचा आरोप मनसेने केला. 

सरसकट सर्व स्क्रीन बुक करून इतर सिनेमांची अडवणूक करण्याचे धोरण चुकीचे आहे. स्वतःचा हिंदी सिनेमा चालविण्याच्या निमित्ताने मराठी सिनेमांची रिलिज डेट पुढे ढकलली जाईल अशा स्वरुपाची खेळी पठाणचे निर्माते करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

पठाण सिनेमाला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा विरोध

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी पठाण सिनेमातील विशिष्ट दृश्यांना आक्षेप घेतला आहे. ही दृश्य हटवली नसल्याचे कारण देत दोन्ही संघटनांनी पठाण सिनेमाला विरोध केला आहे. 

Ganesh Jayanti 2023 Images in Marathi: माघी गणेश जयंती निमित्त मराठी शुभेच्छा फोटो

Maghi Ganesh Jayanti 2023 : कधी आहे माघी गणेश जयंती? माघी गणेश जयंती का साजरी करतात?

Ganpati Atharvashirsha Marathi : संपूर्ण गणपती अथर्वशीर्ष आणि पठणाचे नियम

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी