Money Laundering Case: ईडीसमोर हजर झाली नाही जॅकलीन फर्नांडिस, आता सोमवारचा समन्स

बी टाऊन
विजय तावडे
Updated Oct 16, 2021 | 23:00 IST

ईडी जॅकलीन आणि चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल यांची एकमेकांसमोर चौकशी करू इच्छिते. अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणात तपास यंत्रणांना पैशाची देवाणघेवाण समजून घ्यायची आहे. जॅकलीनचा कथित रुपाने यात संबंध असल्याचा संशय आहे.

Money Laundering Case
मनी लॉंडरिंग प्रकरण 
थोडं पण कामाचं
  • मनी लॉंडरिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसची चौकशी
  • ईडीने चित्रपट अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला समन्स पाठवले
  • जॅकलीनने पीएमएलए कायद्याअंतर्गत आपला जबाब नोंदवला

मुंबई: मनी लॉंडरिंग प्रकरणात सक्तवसूली संचालनालयाने म्हणजे ईडीने चित्रपट अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला समन्स पाठवले आहे. ईडीने जॅकलीनला सोमवारी १८ ऑक्टोबरला दिल्ली येथील कार्यालयात हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. जॅकलीनला आज ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र वैयक्तिक कारणांमुळे जॅकलीन हजर राहू शकली नाही. ईडीला कथित सुकेश चंद्रशेखर विरुद्ध सुरू असलेल्या मनी लॉंडरिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसची चौकशी करायची होती. या प्रकरणासंदर्भात ईडी जॅकलीनला काही प्रश्न विचारू इच्छिते. याच प्रकरणात जॅकलीन एकवेळा ऑगस्टमध्ये ईडीसमोर हजर झाली होती आणि तिने पीएमएलए कायद्याअंतर्गत आपला जबाब नोंदवला होता. (Money Laundering Case:ED issues summon to Jacqueline Fernandez in sukesh Chandrasekhar case)

जॅकलीनची होणार चौकशी
असे मानण्यात येते आहे की आता ईडी जॅकलीन आणि चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल यांची एकमेकांसमोर चौकशी करू इच्छिते. अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणात तपास यंत्रणांना पैशाची देवाणघेवाण समजून घ्यायची आहे. जॅकलीनचा कथित रुपाने यात संबंध असल्याचा संशय आहे. जॅकलीनला ईडीने शुक्रवारी पुन्हा हजर राहण्यास सांगितले होते मात्र ती वैयक्तिक कारणास्तव हजर राहू शकली नाही. 

नोरा फतेहीने नोंदवला जबाब
या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेही यांनी गुरूवारी आपला जबाब नोंदवला होता. त्यांच्या वकीलाने म्हटले होते की नोरा फतेही या प्रकरणात एक पीडित साक्षीदार आहे. ती तपास यंत्रणांना सहकार्य करते आहे. नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने म्हटले की नोरा फतेहीचा कोणत्याही मनी लॉंडरिंग प्रकरणात सहभाग नाही. त्यांनी पुढे म्हटले की नोराला आरोपींबद्दल कोणतीही माहिती नाही. तिचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. ईडीने तिला फक्त मदतीसाठी बोलावले आहे.

चंद्रशेखरकडून २०० कोटींची अफरातफर
चंद्रशेखर आणि पॉलला ईडीने अलीकडेच अटक केली होती. त्यांना एक स्थानिक जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याआधी दिल्ली पोलिसांनी या दोघांना फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंह यांची पत्नी अदितीसारख्या काही हाय प्रोफाईल लोकांसह इतर काही लोकांना फसवण्यासंदर्भात अटक केली होती. ऑगस्टमध्ये ईडीने चंद्रशेखरने परिसरात छापा मारला होता आणि चेन्नईत एक बंगला, ८२.५ लाख रुपये रोख आणि डझनभर लक्झरी कार जप्त केली होती. चंद्रशेखरवर फसवणुकीचा आरोप आहे आणि २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीसंदर्भात दिल्ली पोलिस त्याचा तपास करत आहेत.

दरम्यान क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरूख खाननचा मुलगा आर्यन खानच्या जामीन याचिकेवर गुरूवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. त्यामुळे आर्यनला आता कमीत कमी २० ऑक्टोबरपर्यंत जेलमध्ये राहावे लागेल. एका कुटुंबियाच्या मित्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की शाहरूख आणि गौरी दिवसेंदिवस चिंतेत आहेत. आर्यनसाठी गौरी खानने प्रार्थना केली आहे. नवरात्रीचा उत्सव सुरू झाल्यानंतर तिने गोड पदार्थ खाणे सोडून दिले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी