नग्न ऑडिशन देण्याची मागणी करणारा बहुतेक तो राज कुंद्राच; अभिनेत्रीचा आरोप

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jul 21, 2021 | 13:49 IST

पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात दोषी आढळल्याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला (Raj kundra arrest)  रात्री अटक केली.

Actress Sagarika Sona Suman
अभिनेत्री सागरिका सोना सुमन  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मुंबई येथे फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवून काही अ‍ॅप्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मवर दाखविल्याबद्दल गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता.
  • राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमनने सांगितला वाईट अनुभव
  • मी व्हिडीओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली - अभिनेत्री सागरिका सोना सुमन

मुंबई: पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात दोषी आढळल्याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला (Raj kundra arrest)  रात्री अटक केली. मुंबई येथे फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवून काही अ‍ॅप्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मवर दाखविल्याबद्दल गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली. आता काही अभिनेत्री पुढे येऊन याप्रकरणी आपले अनुभव सांगत आहेत. यामुळे राजच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने तिला आलेल्या एका वाईट अनुभवाविषयी सांगितलं. हे अश्लील चित्रपटांचे एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे. राज कुंद्रा यांचं नाव समोर आल्याचे सागरिका म्हणाली. सागरिका सोना सुमन पुढे म्हणाली, ऑगस्ट 2020 मध्ये मला एका वेब सीरीजमध्ये काम करण्याची ऑफर आली. मी होकार दिल्यावर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाईन ऑडिशन घेण्याचे ठरले. मी व्हिडीओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली. मला धक्का बसला, आणि मी नकार देत कॉल बंद केला, असा दावा सागरिका सोना सुमन हिने केला आहे. तसेच या व्हिडीओ कॉलमध्ये तिघेजण होते. त्यापैकी एकाचा चेहरा झाकलेला होता, तर एक बहुतेक राज कुंद्रा होता. जर तो यात सहभागी असेल, त्याला अटक करुन या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही सागरिकाने केली आहे.

काय आहे पोर्नोग्राफी आणि पोर्नोग्राफिक कंटेटप्रकरणी कायदा 

दरम्यान, पोर्नोग्राफी आणि पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी आपल्या देशात कायदे खूप कडक आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यात आयटी अ‍ॅक्टसोबतच भारतीय दंडविधान (आयपीसी) च्या अनेक कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंद होतो. इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर अशा प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आयटी अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती.

इंटरनेटच्या वापराबरोबर अश्लिलतेचा व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये लैंगिक कृती आणि नग्नतेवर आधारित फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट, ऑडिओ आणि इतर साहित्याचा समावेश होतो. अशा प्रकारचा कंटेट इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित करण्यावर किंवा कुणाला पाठवल्यास त्याच्यावर अँटी पोर्नोग्राफी लॉ लागू होतो.
दुसऱ्या व्यक्तीचे नग्न किंवा अश्लिल व्हिडीओ तयार करणे किंवा असा एमएमएस बनवणारे, अन्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणारे लोक या कायद्यांतर्गत येतात. या कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये आयटी (दुरुस्ती) कायदा 2008 च्या कलम 67(ए), आयपीसीचे कलम 292, 293 २९३, 294, 500 आणि 509 अन्वये शिक्षेची तरतूद आहे. गुन्ह्याच्या गांभीर्याच्या दृष्टीने पहिल्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दहा लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास ही शिक्षा ७ वर्षांपर्यंत वाढू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी