काय झालंय अभिनेत्री मौनीला...पाहा तिचे फोटो

बी टाऊन
Updated Jul 17, 2019 | 21:38 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

मौनी रॉय सोशल मीडिया क्वीन आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपली पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबाबत चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने असे काही फोटो शेअर केलेत ज्यात ती शांत शांत दिसत आहे.

mouni roy
मौनी रॉय 

थोडं पण कामाचं

  • मौनी रॉय अडकली धर्मसंकटात
  • मौनी रॉयचे फोटो सोशल मीडियावर
  • इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत सीरियस फोटो

मुंबई : टीव्हीवरील पॉप्युलर शो क्योंकि सांस भी कभी बहू थी या मालिकेतून आपल्या करिअरला सुरूवात करणारी मौनी रॉय आता सिनेमांमध्ये आपले नाव कमवत आहे. आतापर्यंत तिचे दोन सिनेमे गोल्ड आणि रोमिओ अकबर वॉल्टर रिलीज झाले आहेत. गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या मौनीकडे दोन सिनेमे आहेत. मौनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. फोटोज आणि व्हिडिओजच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना पर्सनल तसेच प्रोफेशनल लाईफबाबत माहिती देत असते. नुकतीच धोनी एका धर्मसंकटात फसली आहे. 

खरंतर मौनीने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज पोस्ट केले आहेत. यात ती डोक्यावर हात ठेवून शांत बसलेली दिसत आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शन लिहिले, धर्म संकट! आता हे धर्मसंकट नेमके कोणते आहे हे तिने काही सांगितलेले नाही. फॅन्सनाही याबाबत आता उत्सुकता लागली आहे. एका युझरने मस्करी करताना लिहिले काय झाले. कोणते संकट आले इतक्या हॉट अॅक्ट्रेसला कोणी प्रपोज केले आहे का? तर दुसऱ्या एका युझरने कमेंट केली की काय धर्मसंकट आले आहे?  एका फोटोत मौनी सीरियस दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत ती हसत आहे. 

या फोटोत तिने न्यूडल स्ट्रीप ब्लॅक टॉप घातला असून त्यात ती खूपच हॉट दिसत आहे. तिने यासोबत ब्लू हाय वेस्ट डेनिम घातली आहे. तिने रिंग्स आणि ब्रेसलेटने आपला लूक कम्प्लिट केला आहे. या दरम्यान मौनीने आपले कुरळे केस मोकळे ठेवले आहेत. तिने आपला लूक व्हाईट स्नीकर्सनी पूर्ण केला आहे. मौनीचा हा स्टायलिश अवतार तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

धर्म संकट ?

A post shared by mon (@imouniroy) on

या सिनेमांमध्ये दिसणार मौनी

मौनी रॉय आता अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्रमध्ये दिसणार आहे. पहिल्यांदा ती या सिनेमात निगेटिव्ह कॅरॅक्टर प्ले करणार आहे. ब्रम्हास्त्रमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत. मौनी, आलिया आणि रणबीरशिवाय या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन आणि नागार्जुनही दिसणार आङेत. पुढच्या वर्षी उन्हाळ्यात हा सिनेमा रिलीज होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी