Movies to Release in December : बॉलिवूडसाठी नोव्हेंबर महिना खास होता एकीकडे अजय देवगणच्या (Ajay Devgan) 'दृश्यम 2' (Drishyam 2) या सिनेमाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. त्याचवेळी वरुण धवनच्या (Varun Dhavan) भेडिया सिनेमानेही चांगली छाप सोडली. आता डिसेंबर महिनाही बॉलिवूडसाठी (movies in December) हॅपनिंग ठरणार आहे. या महिन्यात थिएटरपासून ते ओटीटीपर्यंत अनेक वैविध्यपूर्ण सिनेमा तुमच्या भेटीला येणार आहेत. (Movies to release in December on Ott and theatre)
An Action Hero - 'An Action Hero' हा सिनेमा 2 डिसेंबरला थिएटरमध्ये झळकणार आहे. आयुष्मान खुरानाचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायचा सज्ज झाला आहे. या सिनेमात पुन्हा एकदा आयुष्मान खुरानाचा मस्तीभरा अंदाज पाहायला मिळणार आहे. मलायका अरोराचे आयटम साँग या सिनेमात असल्याचा सिनेमाला बॉक्स ऑफिसवर काही फायदा होणार का? ते सिनेमा रिलीज झाल्यावर कळेलंच.
अधिक वाचा : लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
फ्रेडे - कार्तिक आर्यनच्या फ्रेडे या सिनेमाचीही चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर 2 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात कार्तिकसोबत अलाया फर्निचरवालाही दिसणार आहे.
सर्कस - बॉलिवूड स्टार रणवीर सिंगच्या सिनेमांबाबत चाहते खूप जास्त उत्सुक असतात. रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर सर्कस हा सिनेमा येत्या
25 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर 2 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
गणपत: पार्ट 1 - टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन पुन्हा एकदा 'गणपत: भाग १'मधून एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा 23 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
अधिक वाचा : का साजरा केला जातो जागतिक एड्स दिन
गोविंदा नाम मेरा - विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी स्टारर सिनेमा गोविंदा नाम मेरा १६ डिसेंबरला रिलीज होत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने सिनेमाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.
सलाम वेंकी - सलाम वेंकी या सिनेमातून अभिनेत्री काजोल सिल्व्हर स्क्रीनवर पुनरागमन करत आहे. हा तिचा कमबॅक सिनेमा आहे. 9 डिसेंबरला सिनेमा सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहे.
मूविंग इन विथ मलाइका - सिनेमांसोबतच डिसेंबर महिन्यात 'मूविंग इन विथ मलाइका' हा वेब शोसुद्धा रिलीज होणार आहे. मलायका अरोराचा हा वेब शो 5 डिसेंबरपासून डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
इंडिया लॉकडाउन - प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद यांचा सिनेमा इंडिया लॉकडाउन 2 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर रिलीज होणार आहे. हा सिनेमा कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनवर आधारित आहे.विशेष म्हणजे मराठमोळ्या सई ताम्हणकरने या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.