अशी दिसते हळद चंदनाचं क्रीम लावणारी मृणाल कुलकर्णी

Mrinal Kulkarni Beauty And Fitness Tips For Gorgeous And Glowing Skin : पन्नाशी ओलांडली तरी मृणालचा हसरा रिफ्रेशिंग मूड आजही कायम आहे

Mrinal Kulkarni Beauty And Fitness Tips For Gorgeous And Glowing Skin
अशी दिसते हळद चंदनाचं क्रीम लावणारी मृणाल कुलकर्णी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पन्नाशी ओलांडली तरी मृणालचा हसरा रिफ्रेशिंग मूड आजही कायम
  • मृणालने आयुर्वेदीक उत्पादनाच्या जाहिरातीला प्राधान्य दिले
  • घरातले पदार्थ वापरून सौंदर्यवृद्धी करणे मृणालला आवडते

हळद चंदनाच्या क्रीमच्या जाहिरातीत दिसणारी मृणाल कुलकर्णी : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध टीव्ही कलाकार आहे. आता मृणाल कुलकर्णी 'लाइमलाइट'मध्ये राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण आजही ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. हेअर स्टाईलमध्ये थोडा बदल झाला आहे पण त्वचेचा ग्लो आणि हसरा चेहरा कायम आहे. पन्नाशी ओलांडली तरी मृणालचा हसरा रिफ्रेशिंग मूड आजही कायम आहे. 

रसायनांपासून तयार केलेली क्रीम वापरण्यापेक्षा भारतीय आयुर्वेदिक उत्पादने वापरा असे सांगणारा चेहरा म्हणजे मृणाल कुलकर्णी. कोरोनामुळे जगाचा आयुर्वेदाकडे असलेला ओढा आणखी वाढला आहे. पण ज्या काळात आयुर्वेदाचे महत्त्व कमी झाल्याचे चित्र होते तेव्हाही मृणालने आयुर्वेदीक उत्पादनाच्या जाहिरातीला प्राधान्य दिले. क्रीमच्या जाहिरातीच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी घराघरात पोहोचली. 

व्यावसायिक गरज म्हणून मर्यादीत प्रमाणात मेकअप करणारी आणि पार्लरची ट्रीटमेंट घेणारी मृणाल कुलकर्णी घरगुती उपायांनी सौंदर्य वाढविण्यावर भर देते. घरचे ताजे सकस अन्न खाण्यावर ती भर देते. घरातले पदार्थ वापरून सौंदर्यवृद्धी करणे मृणालला आवडते. 

अभिनयाच्या क्षेत्रात राहण्यासाठी अभिनय आणि फिटनेस महत्त्वाचा असल्याचे मृणाल सांगते. शूटिंग वेळीअवेळी झाले तरी आठ तासांची झोप घेण्यासाठी आवश्यक ते नियोजन मी करते, असे मृणाल कुलकर्णीने सांगितले. रात्री दहा साडेदहा वाजेपर्यंत झोपी जायचे आणि सकाळी ६-७ पर्यंत उठायचे असे करते यामुळे दररोज पुरेशी विश्रांती होते, असे मृणाल म्हणाली.

दररोज ५० मिनिटे व्यायाम करण्याला मृणाल कुलकर्णी प्राधान्य देते. व्यायामातून शरीर, मेंदू आणि त्वचेला लाभ होतो, असे ती म्हणाली. व्यायामामुळे दिवसभराच्या कामासाठी शरीरात नवा उत्साह संचारतो, असे मृणालने सांगितले. 

दिवसभरात पाच वेळा खाते

सकाळी नाश्ता, सकाळी अकरा वाजता फळे, ज्युस किंवा शेक नंतर दुपारी दोन वाजता जेवण, संध्याकाळी पाच वाजता फळे, ड्रायफ्रुट्स (सुकामेवा) आणि रात्री जेवण (हलका आहार) अशा प्रकारे पाच वेळांमध्ये खाण्यावर मृणाल कुलकर्णी भर देते. दररोज सकाळी एक ग्लास दूध पिणे मृणालला आवडते. दूध प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते; असे मृणाल सांगते. 

एक ग्लास दूध कॅल्शियमची गरज भागविण्यास मदत करते. महिलांनी कॅल्शियमच्या गोळ्या खाण्यापेक्षा दूध प्यावे; असे मृणाल आवर्जून सांगते. दूध प्यायल्याने हाडे मजबूत राहतात. शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा आणखी उजळते असे मृणालने सांगितले.

५० मिनिटांचा व्यायाम

व्यायामामुळे शरीर लवचिक होते आणि दिवसभराच्या कामासाठी उत्साह संचारण्यास मदत होते, असे मृणाल म्हणाली. रोजच्या ५० मिनिटांच्या व्यायामामुळे शरीरात रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. अप्रत्यक्षपणे त्वचा उजळविण्यास मदत होते; असेही मृणालने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी