Mrunal Thakur Birthday Special: कोणालाही माहित नाहीत मृणाल ठाकूरची 'ही' Top Secrets

बी टाऊन
Updated Aug 01, 2022 | 18:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mrunal Thakur Birthday Special: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा वाढदिवस ( Mrunal Thakur Birthday ) आहे आणि अभिनेत्रीला ( Actress ) तिचा खास दिवस कुटुंब आणि काही जवळच्या मित्रांसह साजरा करायला आवडतो.आम्ही तुम्हाला तिच्याबद्दलच्या अशा काही गोष्टी सांगमार आहोत ज्याबद्दल तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल. चला जाणून घेऊया या सुंदर अभिनेत्रीची काही ( Secrets ) रहस्य.

Mrunal Thakur birthday today know her secrets
मृणाल ठाकूरची टॉप सिक्रेट्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ही आहेत अभिनेत्री मृणाल ठाकूरची टॉप सिक्रेट्स
  • अभिनेत्रीने मॅट्रिक्स फ्रँचायझीसाठी ऑडिशन दिले होते
  • मृणाल ठाकूर अभिनेत्री नसती तर डेंटिस्ट झाली असती.

Mrunal Thakur Birthday Special: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा वाढदिवस ( Mrunal Thakur Birthday ) आहे आणि अभिनेत्रीला ( Actress ) तिचा खास दिवस कुटुंब आणि काही जवळच्या मित्रांसह साजरा करायला आवडतो. आम्ही तुम्हाला तिच्याबद्दलच्या अशा काही गोष्टी सांगमार आहोत ज्याबद्दल तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल. चला जाणून घेऊया या सुंदर अभिनेत्रीची काही ( Secrets ) रहस्य. ( Mrunal Thakur birthday today know her secrets )


1. मृणाल सहजतेने खान्देशी बोलू शकते

मृणाल  महाराष्ट्रीयन आहे आणि तिचे मूळ गाव महाराष्ट्रातील धुळे आहे. तिची मातृभाषा मराठी असली तरी ती खान्देशीही अस्खलितपणे बोलू शकते. खान्देशी ही महाराष्ट्राच्या खान्देश प्रदेशात म्हणजेच धुळे, जळगाव आणि नंदुरबार इथे बोलली जाणारी भाषा आहे.

 

अधिक वाचा : साहेब! 15 दिवसांची सुट्टी द्या, मला बाप बनायचं आहे

 


2. वयाच्या 17 व्या वर्षी कॉलेजमधून काढण्यात आले होते.


मृणालने तिचे कॉलेज मुंबईतून केले, लहानपणापासूनच ती फक्त 17 वर्षांची होती, तिला नेहमीच अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा होती म्हणून ती विविध मॉडेलिंग असाइनमेंटमध्ये सक्रियपणे भाग घेते, 
ऑडिशन देत होती आणि टेलिव्हिजन शो करत होती. त्यामुळे ती क्लासेसमध्ये जात नव्हती. .शोमध्ये व्यस्त असल्याने कमी उपस्थितीमुळे तिला कॉलेजमधून काढण्यात आले होते.


3. मॅट्रिक्स फ्रँचायझीसाठी ऑडिशन दिले होते


द मॅट्रिक्स हॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि सर्वात मोठ्या फ्रँचायझींपैकी एक आहे, भारतीय वंशाचा अभिनेता भूतकाळात फ्रँचायझीचा एक भाग होता. 2021 मध्ये रिलीज झालेल्या द मॅट्रिक्स रिसरेक्शनमध्ये प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होती, परंतु तुम्हाला माहित आहे का? मृणाल ठाकूरने त्यासाठी ऑडिशन दिले. तीच भूमिका प्रियांकाने या चित्रपटात साकारली होती.

 

अधिक वाचा : राजकारण सोडावंस वाटतंय - रोहित पवार

 


4. डेंटिस्ट होता होता राहिली

कॉलेजमध्ये कमी उपस्थिती हा भाग सोडल्यास मृणाल नेहमीच एक गुणवंत विद्यार्थिनी राहिली आहे विज्ञान आणि वैद्यक हे तिच्या आवडीचे विषय होते.मृणालने चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी डेंटिस्टसाठी देण्यात येणाऱ्या परीक्षेत चांगले गुण मिळवले होते, परंतु त्याऐवजी तिने अभिनेत्री बनण्याची आवड निवडली. आम्हांला आनंद आहे की तिने तिच्या आवडीचे पालन केले नाहीतर पडद्यावर अशा तल्लख अभिनेत्रीला पाहण्यास आपण मुकलो असतो.

5. एक उत्कट मेकअप आणि हेअर आर्टिस्ट आहे

आपल्या सर्वांना माहित आहे की मृणालची मोठी बहीण लोचन ठाकूर हेअर आणि मेकअप आर्टिस्ट आहे, परंतु मृणालला देखील तिच्या मोठ्या बहिणीसारखीच आवड आहे. तिला तिच्या जवळच्या मित्रांसाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी मेकअप आणि हेअर स्टाईल करण्याची आवड आहे आणि आम्हाला खात्री आहे की ती या क्षेत्रातील इतर कोणत्याही व्यावसायिकांप्रमाणेच ती हेअर स्टाईल आणि मेकअप करत असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी