Mukesh Ambani's Niece : भारताचे सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना दोन बहिनी दीप्ति साळगांवकर, नीना कोठारी आणि भाऊ बिजनेस टायकून अनिल अंबानी. दीप्ति साळगांवकर या अंबानी भाऊ बहिनींमध्ये सर्वात छोटी आहे. आणि त्यांना इशिता आणि विक्रम अशी दोन मुलं आहेत. इशिता साळगांवकर ही मुकेश अंबानीची भाची आहे.
इशिताबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. इशिता साळगांवकर ही एक व्यवसायिका आणि उद्योजिका आहे. ती खूप वेगवेगळ्या व्यावसायिक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या सामाजिक कार्यांसाठीही ओळखली जाते. इशिता शिक्षण आणि आरोग्याशी निगडीत उपक्रमांमध्ये सक्रिय असते. इशिताची संपत्तीही कोट्यवधींची आहे आणि ती एक आलिशान आयुष्य जगते. जाणून घेऊया सविस्तर.
मुकेश अंबानीची बहिण दीप्ति साळगांवकर आणि दत्तराज साळगांवकर यांची मुलगी इशिता हीच दोनवेळा लग्न झाले आहे. इशिताचे लग्न अतुल्य मित्तलशी झाले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याच वेळी इशिता चर्चेत आली होती. अतुल्य मित्तल हा अतुल्य बिजनेस टायकून लक्ष्मी निवास मित्तलचा भाचा आहे.
अधिक वाचा :सारा-अनन्याच्या कतार ट्रिपचे अप्रतिम फोटो
अतुल्य हा हार्वर्ड बिझनेस स्कूलचा विद्यार्थी आहे. अतुल्यशी लग्नगाठ बांधण्याआधी इशिताने नीरव मोदीच्या छोट्या भावाशी नीशाल मोदीशी लग्न केलेलं. इशिता आणि नीशालने 2016 साली लग्न केले होते पण, काही काळानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. इशिता पुन्हा पुन्हा अतुल्यच्या प्रेमात पडली आणि 2022 साली एका भव्य समारंभात दोघांनी लग्न केले.
अधिक वाचा :'हलद लाविली रं' कावेरी-राजच्या हळदी सोहळ्यातील धम्माल
इशिता साळगावकर हार्वर्ड बिझनेस स्कूलची माजी विद्यार्थिनी आहे. त्या व्हीएम साळगावकर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या कॉर्पोरेट डेव्हलपमेंटच्या उपाध्यक्षा आहेत. इशिताच्या एकूण संपत्तीबद्दल अद्याप कोणतीही अचूक माहिती उपलब्ध नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, इशिता साळगावकरची संपत्ती करोडो रुपये आहे. ती विलासी जीवन जगते. इशिता व्यवसायातही खूप यशस्वी आहे.