मुंबईच्या डान्स ग्रुपने जिंकला अमेरिका गॉट टॅलेंट शो, रणवीर सिंहनेही केले होते कौतुक 

बी टाऊन
Updated Feb 18, 2020 | 19:42 IST

बेस्ट डान्स ग्रुप वी अनबिटेबल या मुंबईच्या ग्रुपने अमेरिका गॉट टॅलेंट शो : द चॅम्पियन सीझन २ जिंकला आहे.  शोच्या परीक्षकांनी त्यांना विजेता घोषित करत सर्व सदस्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिले.

mumbai based group v unbeatable wins the america got talent ranveer singh share video tmov 12
मुंबईच्या डान्स ग्रुपने जिंकला अमेरिका गॉट टॅलेंट शो, रणवीर सिंहनेही केले होते कौतुक   |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई :  बेस्ट डान्स ग्रुप वी अनबिटेबल या मुंबईच्या ग्रुपने अमेरिका गॉट टॅलेंट शो : द चॅम्पियन सीझन २ जिंकला आहे.  शोच्या परीक्षकांनी त्यांना विजेता घोषित करत सर्व सदस्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिले. वी अनबिटेबल २९ डान्सर्सचा ग्रुप आहे. त्याने द अमेरिका गॉट टॅलेंटमध्ये भाग घेतला होता. 

अमेरिका गॉट टॅलेंटमध्ये येण्यापूर्वी वी अनबिटेबल यांनी डान्स प्लस ४ आणि इंडिया बनेगा मंचमध्येही भाग घेतला होता. २०१९ मध्ये वी अनबिटेबल अमेरिका गॉट टॅलेंटचा हिस्सा बनले होते. त्यावेळी त्यांना चौथे स्थान मिळाले होते. या वर्षी पुन्हा त्यांनी यात स्पर्धेत भाग घेतला आणि यंदा ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. 

 

यापूर्वी बॉलीवडच्या अनेक ताऱ्यांनी वी अनबिटेबल यांना विश केले होते. एक परफॉर्मन्समध्ये त्यांनी रणवीर सिंह यांच्या फिल्म गोलियों की रासलीला-रामलीला याच्या ततड ततड गाण्यावर डान्स केला होता. तो डान्स खूप व्हायरल झाला होता. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ग्रुपला जिंकण्यासाठी शुभकामना दिल्या होत्या. 

 

 

रणवीरने एका व्हिडिओमध्ये या ग्रुपचा कॉन्फिडन्स बुस्ट केला होता. यात रणवीर सिंह म्हणाला की, मी या गोष्टीने खूप खुश आहे की वी अनबिटेबलने 'अमेरिका गॉट टॅलेंट' च्या फिनालेमध्ये आपली जागा बनवली आहे. हे खूप जबरदस्त आहे. मी या डान्स ग्रुपला खूप साऱ्या शुभकामना देतो. मी फक्त येवढेच म्हणेल की जागतिक स्तरावर जे काही मिळवले आहे, ते अभूतपूर्व आहे. जागतिक मंचावर तुम्ही जो शानदार अंदाजात परफॉर्मन्स केला, त्यामुळे आपल्या सर्व देशाचे मन जिंकले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...