आर्यन खानचा तुरुंगात बुधवारपर्यंत मुक्काम; आजची सुनावणी टळली

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 11, 2021 | 15:57 IST

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानचा (Aryan Khan) मुक्काम बुधवारपर्यंत एनसीबी कोठडीतच असणार आहे. कारण आर्यनच्या जामीन अर्जावर थेट बुधवारी सुनावणी करण्यात येणार आहे.

aryan khan bail application hearing will held on Wednesday
आर्यन खानचा तुरुंगात बुधवारपर्यंत मुक्काम  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 3 ऑक्टोबर रोजी आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर आरोपींना ताब्यात घेतले.
  • आर्यनच्या जामीन अर्जावर थेट बुधवारी सुनावणी होणार
  • शनिवारी मुंबई लोअर कोर्टाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानचा (Aryan Khan) मुक्काम बुधवारपर्यंत एनसीबी कोठडीतच असणार आहे. कारण आर्यनच्या जामीन अर्जावर थेट बुधवारी सुनावणी करण्यात येणार आहे. मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आली होती. परंतु एनसीबीनं याचिकेवर उत्तर देण्यासाठी मागितला वेळ मागितला होता. याप्रकरणी किमान 2 ते 3 दिवसांचा वेळ देण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे. अशातच आर्यन खानच्या जामिनावर बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश एनसीबीला देण्यात आले आहेत. 

क्रूज ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तीन लोकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. परंतु, एनसीबीने याचिकेवर उत्तर देण्यासाठी मागितलेल्या वेळामुळे आजची सुनावणी टळली असून आता थेट बुधवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, शनिवारी मुंबई लोअर कोर्टाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. लोअर कोर्टाचं म्हणणं होतं की, एनडीपीएसच्या ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे, त्या कलामांतर्गत जामीन याचिकेवर सुनावणी घेण्याचा त्यांना अधिकार नाही. 

लोअर कोर्टाचे हे निर्देश येईपर्यंत संध्याकाळचे 5 वाजले होते. त्यामुळे आर्यनसह तीन आरोपींचे वकील सत्र न्यायालयात याचिका दाखल करू शकले नाही. तर शनिवारी आणि रविवारी न्यायालय बंद होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 3 ऑक्टोबर रोजी आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर आरोपींना एक लग्जरी क्रूझवरील पार्टीमध्ये ड्रग रेड दरम्यान ताब्यात घेतले होते. एनसीबीने दावा केला होता की, या कारवाई दरम्यान, क्रूझवरुन अनेक वेगवेगळ्या ड्रग्स जप्त करण्यात आल्या. त्यानंतर आरोपींवर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धेमेचा यांचा जामीन फेटाळला

शुक्रवारी क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबईतील फोर्ट न्यायालयात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याचा अर्थ आर्यन खानला सध्या तुरुंगात राहावे लागेल. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धेमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी