Rakhi Sawant ला अटक, Sherlyn Chopra प्रकरणात Mumbai Police कारवाई

Mumbai Police Arrest Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्राम क्विन राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केली. मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने ट्वीट करून राखीला अटक झाल्याची माहिती दिली.

Mumbai Police Arrest Rakhi Sawant
मॉडेल आणि अभिनेत्री राखी सावंतला अटक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मॉडेल आणि अभिनेत्री राखी सावंतला अटक
  • मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने दिली माहिती
  • मुंबई पोलिसांनी राखीला केली अटक

Mumbai Police Arrest Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्राम क्विन राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केली. मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने ट्वीट करून राखीला अटक झाल्याची माहिती दिली. मुंबईच्या आंबोली पोलीस ठाण्याने राखीला अटक करण्याची कारवाई केली. राखीला पोलीस अंधेरी कोर्टात हजर करणार आहेत. 

विना परवानगी आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केल्याप्रकरणी एका मॉडेलने राखी विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात पोलिसांनी राखीला अटक केली. याआधी राखीने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केले. पण राखीचा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर पोलिसांनी राखी विरोधात अटकेची कारवाई केली. 

राखी सावंत आज (गुरुवार 19 जानेवारी 2023) तिची डान्स अॅकॅडमी सुरू करणार होती. या अॅकॅडमीत राखीचा पती आदिल खान दुर्रानी तिचा पार्टनर आहे. पण अॅकॅडमीच्या लाँचिंगआधी राखीच्या अटकेची बातमी आली आहे.

राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यातील वाद जुना आहे. काही महिन्यांपूर्वी शर्लिनने साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. विशेष म्हणजे शर्लिन आरोप करत असताना राखी साजिदची बाजू घेऊन मीडियाशी बोलत होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी