दिशासोबत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या टायगरला मुंबई पोलिसांनी हटकलं; दाखल केली FIR

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jun 03, 2021 | 10:19 IST

ज्यात काही प्रमाणा निर्बंध हटवण्यात आलेले असली तरी पूर्णत लॉकडाऊन (Lockdown)उठवण्यात आलेले नाही.

Mumbai Police Registered FIR Against Tiger Shroff And Disha patani
लॉकडाऊनचे नियम तोडल्याप्रकरणी टायगर आणि दिशा पटानीवर FIR   |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊनचे नियम तोडल्याप्रकरणी टायगर आणि दिशा पटानीवर FIR
  • मुंबई पोलिसांनी दाखल केली गुन्हा नोंदवला आहे.
  • बांद्रातील बँण्डस्टँड जवळ पोलिसांनी टायगरला हटकलं.

मुंबई : राज्यात काही प्रमाणा निर्बंध हटवण्यात आलेले असली तरी पूर्णत लॉकडाऊन (Lockdown)उठवण्यात आलेले नाही. सरकारने लावलेल्या लॉकडऊनच्या नियमांची  अनेकांकडून पायमल्ली केली जाते. यात अनेक सेलिब्रिटी देखील आपलं कर्तव्य विसरताना दिसतात. मंगळवारी टायगरही लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करत आपल्या प्रेयसीसोबत कारमध्ये फिरताना दिसला.  

लॉकडाऊन असताना अभिनेता टायगर श्रॉफ (Actor Tiger Shroff) आणि प्रेयसी अभिनेत्री दिशा पटानी (Actress Disha Patani) कारने फेरी मारत होते. दुसरी फेरी मारत असताना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्या दोघांना बँण्डस्टँड जवळ हटकलं आणि  त्यानंतर त्यांच्या विरोधात  कोविड -१९ लॉकडाऊनचे नियम तोडल्याप्रकरणी  एफआयआर नोंदवण्यात आली आहे. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या जीममधून परतलेले दिशा आणि टायगर हे बांद्रा मध्ये कारने फिरत होते.  कारमध्ये दिशा पुढे बसलेली होती आणि टायगर तिच्या मागच्या सीटवर बसलेला होता. पोलिसांनी त्यांना बँण्डस्टँड वर हटकल्यानंतर त्यांचे ओळखपत्र आधार कार्ड तपासले आणि त्यानंतर सोडण्यात आले पण त्यांच्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. 

लॉकडाऊन असतानाही फेरफटका मारणं महागात

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण कमी होत असून अनेक शहर कोरोनामुक्त होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंध हटवण्यात आले आहे. याचा फायदा घेऊन काही जण घराबाहेर पडताना दिसत आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री दिशा पाटणी आणि त्यांचा ड्रायव्हर या तिघांविरुद्ध वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोणत्याही वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरणे, तसेच साथीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानसभा कलम 188, 34 IPC दिनांक 2.6.2021 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी या दोघांना लॉकडाऊन असतानाही फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणे चांगलेच महागात पडले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी