अभिनेत्री कंगनाच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून समन्स

Mumbai Police summons Kangana Ranaut & her sister Rangoli: अभिनेत्री कंगना राणावतला मुंबई पोलिसांनी समन्स पाठवलं असून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. कंगनासोबत तिची बहीण रंगोलीला सुद्धा समन्स पाठवले आहे.

Kangana Ranaut
अभिनेत्री कंगना राणावत (फाईल फोटो) 

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री कंगना राणावतला मुंबई पोलिसांकडून समन्स
  • कंगनाची बहीण रंगोली हिला सुद्धा पोलिसांनी पाठवलं समन्स
  • कंगना आणि रंगोलीला २६ ऑक्टोबर रोजी चौशीसाठी हजर राहण्याच्या केल्या सूचना

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावर आता मुंबई पोलिसांनी तिला समन्स पाठवलं आहे. कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली या दोघींनाही मुंबई पोलिसांनी समन्स पाठवलं (Mumbai Police summons Kangana Ranaut & her sister Rangoli) असून २६ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. मुंबई पोलिसांकडून कंगना विरोधात १५३ A, २९५A आणि १२४ A या कलमांच्या अंतर्गत गुनहा दाखल केला आहे.

मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैयद या दोघांनी कंगना विरोधात वांद्रे न्यायालयात याचिका दाखल केली होती. कंगना आक्षेपार्ह ट्वीट्स करुन दोन समाजात दरी निर्माण करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता दोघींनाही चौकशीसाठी बोलवले आहे.

Kangna Ranaut summon

आपल्या याचिकेत आरोप याचिकाकर्त्यांनी आरोप केला होता की, कंगना राणावत हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हिंदू आणि मुस्लिम कलाकारांत दरी निर्माण होईल असे म्हटलं होतं. तसेच वेगवेगळ्या चॅनल्सलाही मुलखती देत त्यावर भाष्य केलं होतं. या याचिकेवर सुनावणी करताना वांद्रे न्यायलयाने कंगना आणि रंगोली या दोन्ही बहिणींवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बॉलिवूड क्वीन कंगना राणावत ही गेल्या दोन महिन्यांपासून हिंदी चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही कास्टिंग डायटरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर मुन्नावली सय्यद यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. 

गेल्या काही दिवसांपासून कंगना सोशल मीडियात अनेक ट्वीट्स करत आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत सुद्धा केली होती. त्यानंतर शिवसेना आणि कंगना राणावत यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला होता. तर कंगनाने यापुढे जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी