टीव्ही अभिनेत्रीने अभिषेक तिवारीवर केला बलात्काराचा आरोप

एका टीव्ही अभिनेत्रीने कलाकारांची निवड करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टर अभिषेक तिवारीवर बलात्कार केल्याचा आरोप केला. अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Mumbai TV actress accuses casting director of rape
टीव्ही अभिनेत्रीने अभिषेक तिवारीवर केला बलात्काराचा आरोप 

थोडं पण कामाचं

  • टीव्ही अभिनेत्रीने कास्टिंग डायरेक्टर अभिषेक तिवारीवर केला बलात्काराचा आरोप
  • वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार
  • अभिनेत्रीच्या आरोपांप्रकरणी पोलीस तपास सुरू

मुंबईः एका टीव्ही अभिनेत्रीने कलाकारांची निवड करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टर अभिषेक तिवारीवर बलात्कार केल्याचा आरोप केला. अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कलम ३७६ अंतर्गत एफआयआर नोंदवून मुंबई पोलिसांनी अभिनेत्रीचे स्टेटमेंट घेतले. अभिनेत्रीचे म्हणणे नोंदवून ७२ तासांपेक्षा जास्त कालावाधी लोटला तरी पोलिसांनी या प्रकरणात अभिषेक तिवारीला (Ayush Tiwari) अटक केलेली नाही. (Mumbai TV actress accuses casting director of rape)

लग्नाचे आश्वासन देऊन कास्टिंग डायरेक्टर अभिषेक तिवारीने बलात्कार केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. साधारणपणे महिलेने बलात्काराचे आरोप केले तर आरोपीला एफआयआर नोंदवल्यापासून २४ तासांच्या आत चौकशीसाठी बोलावले जाते आणि आवश्यकता भासल्यास अटक केली जाते. अभिनेत्रीच्या आरोपांप्रकरणी तपास सुरू आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीशी संबंधित बेकायदा घडामोडींसाठी मुंबई वारंवार चर्चेत येत आहेत. याआधी २३ नोव्हेंबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (Narcotics Control Bureau - NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे.

सुशांत केस आणि नार्कोटिक्स ब्युरोची कारवाई

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना मुंबईत लॉकडाऊन काळातही बंदी असलेल्या ड्रगचा पुरवठा व्यवस्थित सुरू होता, अशी माहिती हाती आली. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणी स्वतंत्र तपासकाम सुरू केले. छापे टाकून तसेच संशयितांची चौकशी करुन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली. अनेक ड्रग पेडलर आणि सेलिब्रेटी हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. काहींना अटकेनंतर सशर्त जामीन मिळाला.

टीव्ही अभिनेत्री भारती सिंह आणि पती हर्ष लिम्बाचिया या दोघांना अटक झाली. दोघांनी घरात गांजा आणल्याचे तसेच त्याचे सेवन केल्याची कबुली दिली. घरातून ८६.५ ग्रॅम गांजा जप्त झाला. हा गांजा आपणच आणल्याचे त्यांनी मान्य केले. या प्रकरणात दोघांना आधी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि तपासात सहकार्य करणार असे सांगितल्यानंतर जामीन देण्यात आला. याआधी खार दांडा परिसरातून एका ड्रग पेडलरला अटक झाली. या पेडलरच्या चौकशीनंतर भारती आणि हर्ष विरोधात कारवाई झाली.

काही दिवसांपूर्वी ड्रग प्रकरणात फैझल आणि अभिनेत्री प्रीतिका चौहान (Preetika Chauhan) या दोघांना अटक झाली. अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) त्याच्यासोबत राहात असलेली गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades) तसेच गॅब्रिएलाचा भाऊ गिसिलाओस (Agisilaos Demetriades) आणि अर्जुनचा ऑस्ट्रेलियन वंशाचा आर्किटेक्ट मित्र पॉल बर्टेल या सर्वांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशी केली. गिसिलाओस आणि पॉल बर्टेलला अटक झाली. प्रसिद्ध निर्माते फिरोज नादियाडवाला (Bollywood producer Firoz Nadiadwala) यांची पत्नी शबाना सईद हिला अटक झाली. 

याआधी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला अटक झाली. सध्या रियासह काही आरोपी सशर्त जामिनावर आहेत. रियाचा भाऊ शौविक (Showik Chakraborty) अद्याप ड्रग केसमध्ये जेलमध्येच आहे. एनसीबीने ड्रग प्रकरणी बॉलिवूडच्या (Bollywood) काही दिग्गजांची चौकशी केली. यात दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) या अभिनेत्रींचा (Famous Actress) समावेश आहे. टॅलेंट मॅनजेर करिश्मा, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रुती मोदी तसेच फॅशन डिझायनर (fashion designer) सिमॉन खंबाटा (Simone Khambatta) यांचीही चौकशी झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी