'हम आपके है कौन'च्या संगीतकाराचे निधन

'हम आपके है कौन' आणि 'मैने प्यार किया'चे संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे नागपूरमध्ये निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Music composer Raamlaxman of Hum Aapke Hain Koun fame dies at 78
'हम आपके है कौन'च्या संगीतकाराचे निधन 
थोडं पण कामाचं
  • 'हम आपके है कौन'च्या संगीतकाराचे निधन
  • ७८ वर्षांचे होते
  • आजारी होते

नागपूर - 'हम आपके है कौन' आणि 'मैने प्यार किया'चे संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे नागपूरमध्ये निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Music composer Raamlaxman of Hum Aapke Hain Koun fame dies at 78

संगीतकार राम लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशीनाथ पाटील असे होते. त्यांनी जवळपास २०० सिनेमांसाठी संगीत दिले होते. यात प्रामुख्याने हिंदी, भोजपुरी आणि मराठी सिनेमे होते. राजश्री प्रॉडक्शनच्या हिंदी सिनेमांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. 

दादा कोंडके यांनी संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांना सिनेसृष्टीत आणले. सुरुवातीला दादा कोंडके यांच्या मराठी आणि हिंदी सिनेमांचे संगीत संगीतकार राम लक्ष्मण यांनी केले. पुढे त्यांना आणखी संधी मिळाली. 

संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच लता मंगेशकर यांनी शोक व्यक्त केला. 'राम लक्ष्मण गुणी आणि लोकप्रिय कलाकार होते. एक उत्तम माणूस होते. त्यांच्या जाण्याने दुःख होत आहे. मी त्यांच्यासोबत केलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली. आज त्यांना श्रद्धांजली वाहते' अशा शब्दात लतादीदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

मूळात सुरेंद्र यांनी स्वतःसाठी राम हे टोपण नाव घेतले होते. तर विजय पाटील यांनी लक्ष्मण हे टोपण नाव घेतले होते. ते दोघे एकत्रितपणे संगीत देणार असे ठरले. पण पहिल्या सिनेमाचे संगीत देण्याचे काम झाले आणि सुरेंद्र यांचे १९७६ मध्येच निधन झाले. यानंतर विजय पाटील यांनी राम लक्ष्मण या नावाने संगीत देण्याचे काम सुरू ठेवले. 

राजश्री प्रॉडक्शनच्या १९८९ मध्ये आलेल्या 'मैने प्यार किया' या सिनेमाच्या संगीतामुळे संगीतकार राम लक्ष्मण प्रचंड लोकप्रिय झाले. नंतर त्यांनी '100 डेज', 'अनमोल', 'आय लव्ह यू', 'हम साथ साथ है' अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी