मुंबई : साऊथ स्टार समंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर, अभिनेता नागा चैतन्य आता मोस्ट हँडसम बॅचलरच्या कॅटरीत परतला आहे. पण, चैतन्यला त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेम मिळाल्यासारखं वाटतंय! नागा 'मेड इन हेवन' फेम शोभिता धुलिपाला यांच्यासोबत त्यांच्या नवीन घरी दिसल्यापासून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. (Naga Chaitanya in love with this heroine after divorce! Samantha remained silent about this affair)
अधिक वाचा :
Pushpa 2 The Rule: पुष्पा पार्ट २ ची स्टोरी लीक! चित्रपटात या व्यक्तीकडून होणार श्रीवल्लीचा मृत्यू
नागाने हैदराबादमधील जुबली हिल्समध्ये नवीन मालमत्ता खरेदी केली आहे, ज्याचे सध्या बांधकाम सुरू आहे. नागा चैतन्यने नुकतेच शोभिताला आपल्या आलिशान घराची सैर करुन आणली. काही तासांनंतर ते दोघे एकाच गाडीतून एकत्र गेले. शोभिता धुलीपाला तिच्या शेवटच्या चित्रपट मेजरच्या प्रमोशनसाठी जिथे थांबली होती त्याच हॉटेलमध्ये अभिनेत्याला अनेक वेळा पाहण्यात आले होते. खरं तर, त्याने अलीकडेच त्याचा वाढदिवस त्याच्या 'जवळच्या मित्रां'सोबत हैदराबादमध्ये घालवला.
अधिक वाचा :
आता या अफेअरच्या चर्चेवर समंथा रुथ प्रभूने मौन सोडले आहे. मंगळवारी समांथाने अफेअरची बातमी असलेले ट्विट रिट्विट करत लिहिले, 'जर मुलीबद्दल काही अफवा असेल तर ती नक्कीच बरोबर असेल. जर त्या मुलाबद्दल अफवा असेल तर ती त्या मुलीनेच पसरवली असावी. मोठे व्हा मित्रांनो... आपण ज्या दोन व्यक्तींबद्दल बोलत आहोत त्यांनी आपापल्या आयुष्यात प्रगती केली आहे. तुमच्या कामावर लक्ष द्या... तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. पुढे जा!!'