नाना पाटेकर दमदार आवाजात करणार 'कन्फेशन’ ; ‘द कन्फेशन’चा टीझर प्रदर्शित

बी टाऊन
भरत जाधव
Updated Apr 10, 2022 | 12:07 IST

 प्रसिद्ध अभिनेते (Famous actor )  नाना पाटेकर (Nana Patekar)  बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर चित्रपटातून(movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘द कन्फेशन’चा (The Confession) टीझर (Teaser) प्रदर्शित झाला असून त्याची सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Teaser of 'The Confession' screened
‘द कन्फेशन’चा टीझर प्रदर्शित  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरूनल या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.
  • बऱ्याच दिवसानंतर नाना पाटेकर मोठ्या पदड्यावर दिसणार आहेत.
  • टीझरवरुन प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

मुंबई :  प्रसिद्ध अभिनेते (Famous actor )  नाना पाटेकर (Nana Patekar)  बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर चित्रपटातून(movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘द कन्फेशन’चा (The Confession) टीझर (Teaser) प्रदर्शित झाला असून त्याची सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर ‘द कन्फेशन’चा टीझर व्हायरल झाला आहे. या टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे. 
 नाना पाटेकर लवकरच ते दमदार अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत असून  टीझरमध्ये त्यांचा भरदस्त आवाज ऐकू येत आहे. केवळ २२ सेकंदांच्या या टीझरनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

या टीझरच्या सुरुवातीला नाना पाटेकर “सच का चेहरा देख लिया मैंने, सच की आवाज भी सुनली, सच जानकर भी कुबूल नही मुझे, अगर जान भी जाए वो कुबूल है मुझे” असं बोलताना ऐकू येत आणि सर्वात शेवटी ते न्यायालयातील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले दिसून येत आहेत. दरम्यान हा चित्रपट नेमका कोणत्या विषयावर आधारित आहे याचा उलगडा टीझरमधून झालेला नाही त्यामुळे या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. 

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरून नाना पाटेकर यांच्या या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘नाना पाटेकर लवकरच द कन्फेशन या चित्रपटात दिसणार आहेत. मोठ्या ब्रेकनंतर ते मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. त्यांच्या ‘द कनफेशन’ चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन करणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी