नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या! नानीचा 'Dasara' शो पाहून थिएटरमध्ये फॅन्स झाले क्रेझी

Dasara Vs Bholaa: बॉक्स ऑफिसवर तिसर्‍या दिवशी अजय देवगणच्या भोला या चित्रपटाने कमाईत वाढ केली असून आजपर्यंत सर्वाधिक कलेक्शन केले असले तरी नानीच्या दसाराच्या तुलनेत तो मागे राहिला आहे. जाणून घ्या दोघांचे कलेक्शन...

नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या! नानीचा 'Dasara' शो पाहून थिएटरमध्ये फॅन्स झाले क्रेझी
Nani's Dasara became a blockbuster, earned a lot in 3 days  |  फोटो सौजन्य: BCCL

Dasara and Bholaa Day 3 Box office Collection:  बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा मागील रिलीज 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. दृश्यम 2 नंतर, भोलाकडून प्रेक्षकाच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या, पण तसे होऊ शकले नाही. भोला प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. शनिवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी झेप घेतली असली तरी, तो नानी आणि कीर्ती सुरेश यांच्या दसरा चित्रपटाच्या तुलनेत मागे पडला आहे.

अधिक वाचा : Sayali patil : मी त्यांना अभिनेते म्हणून नाही पाहिलं, तर... ; सायली पाटीलनं सांगितला बिग बीसोबतचा अनुभव

अजय देवगण, तब्बू, संजय मिश्रा, दीपक डोबरियाल, गजराज राव, आमिर खान स्टारर चित्रपट भोलाने पहिल्या दिवशी 11.20 कोटी रुपयांची कमाई केली. दुसरीकडे, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली आणि ती केवळ 7.40 कोटींवर आली. त्यामुळे चित्रपटाने दोन दिवसांत एकूण 18.60 कोटींचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत तेजी आली आहे आणि सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, शनिवारी चित्रपटाने सुमारे 12 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच चित्रपटाचे एकूण कलेक्शन जवळपास 30.60 कोटी रुपये झाले आहे.

अधिक वाचा : कॅमेरा दिसताच तिने कंबर लचकवली, चाहत्यांची नजर डीप नेकच्या ब्लाऊजवर खिळली

साऊथ स्टार नानीच्या दसारा चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 23.20 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 9.75 कोटी रुपये कमवले.  तिसऱ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन जवळपास 13 कोटी रुपये झाले आहे. त्यामुळेच चित्रपटाचे कलेक्शन 45.95 कोटी रुपये झाले आहे. दसऱ्याने तेलगू वर्जनमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे, तर चित्रपटाच्या हिंदी वर्जनने पहिल्या दिवशी केवळ 53 लाख आणि दुसऱ्या दिवशी 43 लाखांची कमाई केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी