नर्गिसवरील प्रेमापोटी सुनील दत्तांनी आगीत घेतली उडी; नंतर दिलं आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन

बी टाऊन
भरत जाधव
Updated May 03, 2021 | 13:16 IST

बॉलीवूड (Bollywood) च्या दुनियेत आपल्या दमदार अभिनय कौशल्य आणि सुंदरतेमुळे नरगीस दत्त नेहमी चर्चेत राहिल्या होत्या. नरगीस दत्त (Nargis Dutt)  यांच मूळ नाव फातिमा रशीद होतं.

Nargis Death Anniversary:
Nargis Death Anniversary:नर्गिसच्या प्रेमासाठी आगीत घेतली उडी  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • नर्गिस दत्त यांच मूळ नाव फातिमा रशीद होतं
  • अभिनय कौशल्य आणि सुंदरतेमुळे नरगीस दत्त नेहमी चर्चेत राहिल्या
  • 'मदर इंडिया' चित्रपटात जुळलं सुनील दत्त आणि नर्गिसच प्रेम

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) च्या दुनियेत आपल्या दमदार अभिनय कौशल्य आणि सुंदरतेमुळे नर्गिस दत्त नेहमी चर्चेत राहिल्या होत्या. नर्गिस दत्त (Nargis Dutt)  यांच मूळ नाव फातिमा रशीद होतं. आपल्या तीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी आग, मदर इंडिया, आवारा, बरसात, श्री ४२० आणि चोरी  यांसह अनेक यशस्वी चित्रपटांतून अभिनय केला.  अल्पकाळातच त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पण सगळ्यात जास्त चर्चा राहिली ती म्हणजे सनील दत्त आणि नरगीस यांच्या प्रेम प्रकरणाची. आज नर्गिस दत्त यांची पुण्यतिथी.  यानिमित्ताने सुनील दत्ता आणि नर्गिस यांचा एक किस्सा आज सांगत आहोत..

नर्गिसला पाहताच क्षणी सुनील दत्त यांना काही सुचेना 

नर्गिस ह्या आधीच चित्रपट सृष्टीत आल्या होता, त्याकाळी  सुनील दत्त हे ऑल इंडिया रेडिओमध्ये रेडिओ जॉकी म्हणून  काम करत होते. त्याकाळी नरगीस एक ख्यातनाम अभिनेत्री होत्या, सुनील दत्त यांना त्या आवडत होत्या. त्यातच त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीची मुलाखत घेण्याची संधी सुनील दत्त यांना  मिळाली.  जेव्हा नर्गिस मुलाखतीसाठी आल्या त्यावेळी त्यांना पाहून  सुनील दत्त यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. नर्गिसला समोर पाहून ते इतके नर्वस झाले होते की, त्यांना मुलाखत व्यवस्थितपणे घेता आली नाही. 

नर्गिससाठी आगीत घेतली उडी 

सुनील दत्त आणि नर्गिस यांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटासारखी होती. नर्गिसला पाहून नर्वस होणारे सुनील दत्त हे त्याच नर्गिस समोर हिरो झाले. यांचा खूप मजेदार किस्सा आहे.   मदर इंडिया या चित्रपटाचे चित्रिकरण चालू होते, या चित्रपटात सुनील दत्त याचीही भुमिका होती. या चित्रपटाच्या एका सीनदरम्यान आग लागली, त्या आगीत नर्गिस ह्या  अडकल्या होत्या. नर्गिस यांना आगीत अडकल्याचं पाहताच सुनील दत्त यांनी कोणता विचार न करता आगीत उडी घेतली आणि नर्गिस यांचा जीव वाचवला. यादरम्यान सुनील दत्त यांना भाजलं होतं, पण ते नर्गिस समोर त्यादिवशी हिरो ठरले.  

सुनील यांच्या या शौर्याने नर्गिस यांचं मन जिंकलं. चित्रपट रिलीजच्या दुसर्‍याच वर्षी दोघांनी 1958 मध्ये लग्न केलं. लग्नानंतरच चित्रपटांमध्ये सुनील दत्त यांचा सुवर्णकाळ सुरू झाला. त्यांनी 'सुजाता' आणि 'साधना' सारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात काम केले. दरम्यान सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या प्रेमाचं उदाहरण दिलं जातं. नर्गिस यांना कॅन्सरचा आजार होता, त्यांची तब्येत इतकी खालवली होती की, त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी सुनील दत्त यांना सल्ला दिला होता की, नर्गिसचा लाइफ सपोर्ट काढून टाकावा. परंतु डॉक्टरचा सल्ला त्यांनी ऐकला नाही आणि नर्गिस यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते सोबत होते. नर्गिस यांचा मृत्यू ३ मे रोजी झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी