Rashmika Mandanna and Vijay Devarkonda : विजय देवरकोंडानं केलं तोंडभरून कौतुक, सुंदर म्हणताच अशी लाजली नॅशनल क्रश; Video Viral

बी टाऊन
Updated Aug 01, 2022 | 15:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rashmika and Vijay Devarkonda relationship : विजय देवरकोंडा ( Vijay Devarkonda ) यांनी सीता-रामम या चित्रपटाच्या म्युझिक प्री-रिलीज कार्यक्रमाला भेट दिली ज्यात रश्मिका मंदान्ना ( Rashmika mandanna ) मुख्य भूमिकेत आहे. कार्यक्रमादरम्यान विजयने रश्मिकाचे कौतुक केले आणि तिला 'सुंदर' म्हटले. विजय देवरकोंडाने केलेले कौतुक ऐकताच रश्मिका मंदान्ना लाजेने चूरचूर झाली.

National crush Rashmika Mandanna blushes when vijay devarakonda call her pretty
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा रिलेशनशीप  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा रिलेशनशीप
  • विजय देवरकोंडाने स्तुती करताच रश्मिका मंदान्ना लाजली
  • रश्मिका आणि विजय रिलेशनशीपमध्ये असल्याच्या अफवांना उधाण

Rashmika and Vijay Devarkonda relationship : विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda ) यांनी सीता-रामम या चित्रपटाच्या म्युझिक प्री-रिलीज  कार्यक्रमाला भेट दिली ज्यात रश्मिका मंदान्ना ( Rashmika Mandanna ) मुख्य भूमिकेत आहे. कार्यक्रमादरम्यान विजयने रश्मिकाचे कौतुक केले आणि तिला 'सुंदर आणि फक्त सुंदर' म्हटले. विजय देवरकोंडाने केलेले कौतुक ऐकताच रश्मिका मंदान्ना लाजेने चूरचूर झाली. ( National crush Rashmika Mandanna blushes when vijay devarakonda call her pretty Video Viral )

अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी दोन सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांची सिल्व्हर स्क्रीनवरील केमिस्ट्री खूपच छान आहे. अलीकडे, त्यांच्या डेटिंगच्या अफवा सोशल मीडियावर येत आहेत. असं असूनही प्रत्यक्षात मात्र हे दोघेंही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आगामी तेलुगू सिनेमा सीता राममच्या प्री-रिलीज संगीत कार्यक्रमाला विजय देवरकोंडाने हजेरी लावली. सीता-रामम या सिनेमात रश्मिका मंदान्ना प्रमुख भूमिकेत आहे. यावेळी रश्मिका विजय देवरकोंडाने केलेली कमेंट ऐकताच क्षणी लाजेने चूरचूर झाली. 

अधिक वाचा : आता व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन्सना मिळणार जास्त अधिकार

शोचा एक प्रोमो व्हिडिओ निर्मात्यांनी प्रसिद्ध केला आहे आणि त्यात विजय रश्मिका मंदान्नाच्या लूकचे कौतुक करताना दिसत आहे. “रश्मिका, तू नेहमीच खूप सुंदर दिसतेस… मी तुझे नाव घेताच प्रत्येकजण हसतो, का ते नाही कळत मला, असेही विजय देवरकोंडाने म्हटले आहे” 

विजय अलीकडेच त्याची लायगर को-स्टार अनन्या पांडेसोबत कॉफी विथ करणमध्ये दिसला. शो दरम्यान करणने विजयला रश्मिकाला डेट करत असल्याच्या बातम्यांबद्दल विचारले.  विजयने उत्तर दिले, "आम्ही करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात दोन चित्रपट एकत्र केले आहेत. ती खूप छान आहे. मला ती खूप आवडते. आम्ही खरोखर चांगले मित्र आहोत. आम्ही चित्रपटांमधून खूप काही शेअर करतो, त्यामुळे एक रिलेशन आपोआपच तयार होते" तो असेही म्हणाला की तो त्याच्या नात्याची स्थिती उघड करू इच्छित नाही कारण त्याला त्याच्या चाहत्यांची मनं तोडायची नाहीत.

अधिक वाचा : जीवे मारण्याच्या धमकीनंतर Salman Khanला मिळाली मोठी परवानगी

अनन्याने मात्र रश्मिका आणि विजयच्या डेटिंगबद्दल एक प्रमुख इशारा दिला. रॅपिड-फायर राउंड दरम्यान विजयच्या नातेसंबंधाच्या स्थितीवर टिप्पणी करण्यास विचारले असता, अनन्याने शब्दांवर कोटी करत उत्तर दिले, "मला असे वाटते की तो घाईत आहे... मिका...सिंगला भेटण्यासाठी." अनन्या हसत राहिल्याने करणलाही त्यामागचा अर्थ कळला आणि म्हणाला, "अरे तो मिकाला भेटायला घाईत आहे. " इतक्यात विजयने अनन्याला सहज विचारलं, "तुला असं वाटतं?" आणि तिने उत्तर दिले, "हो."

अधिक वाचा : पोरी-पोरांनो 'या' चार राशींचे लोक राहतात सर्वाधिक रोमँटिक


विजय आणि रश्मिका यांनी 2018 मधील 'गीता गोविंदम' आणि 2019 मधील 'डिअर कॉम्रेड' सिनेमात एकत्र काम केले आहे. गेल्या वर्षी दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र स्पॉट झाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी