National Eye Donation Fortnight: "आँखे भी कमाल करती है...'या'बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिलंय नेत्रदाने वचन

बी टाऊन
Updated Aug 25, 2022 | 20:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

National Eye Donation Fortnight: नेत्रदानाबद्दल (National Eye Donation) जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो. नेत्रदानाचे कारण लक्षात घेऊन अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ( Bollywood celebrity ) आहेत ज्यांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

National eye donation fortnight bollywood celebs who pledged their eyes
'या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिलंय नेत्रदानाचे वचन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलंय नेत्रदान
  • बिग बी अमिताभ बच्चन यांनीही अवयव दान करण्यासाठी एनजीओशी करार केलेला आहे
  • जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय नेत्रदानाचा पंधरवडा सेलिब्रेट करणार

National Eye Donation Fortnight: तुम्हाला मिळालेली दृष्टी ही देणगी खरोखरच आजवरच्या सर्वात मौल्यवान भेट आहे. जगातील सर्व रंगांचा आणि वैभवाचा आनंद यामुळे तुम्ही घेऊ शकता. मात्र, जगात असेही बरेचजण आहेत ज्यांना दृष्टीदोष, डोळे नसण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. कधी कधी त्यांना वेळेवर उपचारही मिळत नाहीत.नेत्रदान (National Eye Donation) पुण्यदान असे म्हटले जाते. त्यामुळेच नेत्रदानाबाबात जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ( Bollywood Celebrity ) आहेत ज्यांनी नेत्रदान करण्याचे वचन दिले आहे. ( National eye donation fortnight bollywood celebs who pledged their eyes)

अमिताभ बच्चन 

स्टार ऑफ द मिलेनिअर बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांनीही अवयव दान करण्यासाठी एका एनजीओशी करार केल्याचं एका अहवालात म्हटले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही नेत्रदान करण्याचे वचन दिले आहे.

अधिक वाचा : बैल पोळा सणाच्या शुभेच्छा images

ऐश्वर्या राय-बच्चन 

माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या ( Aishwarya Rai Bachchan ) डोळ्यांचा हेवा कोणाला वाटणार नाही. ऐश्वर्यानेही नेत्रदान केलेले आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळातच तिने हा निर्णय घेतला.

रणदीप हुडा

अभिनेत्री काजल अग्रवालसोबत 'दो लफ्ज़ों की कहानी' या चित्रपटानंतर रणदीप हुडानेही नेत्रदानाचा निर्णय घेतला. ट्विटरवरून रणदीप हुडाने (Randeep huda ) ही घोषणा केली. 

अधिक वाचा :  तुमच्या रक्तातील साखरेसाठी महत्त्वाचे असते नाश्त्याचा पदार्थ

सुनील शेट्टी

अभिनेता सुनील शेट्टीनेही (Sunil Shetty ) नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याने नेत्रदान केलेले आहे.

राणी मुखर्जी

बंटी आणि बबली फेम अभिनेत्री राणी मुखर्जीनेही (Rani Mukharji ) नेत्रदानाचा निर्णय घेतलेला आहे. इतरांना दृष्टी देण्यासाठी, त्यांना जग पाहता यावं यासाठी राणी मुखर्जीनेही नेत्रदान करण्याचे ठरवले आहे. 


फराह खान 

चित्रपट निर्माती फराह खान (Farah Khan ), ही देखील अवयव दानासाठी पुढे आलेली आहे. तिने तिच्या डोळ्यांनंतर इतर अवयवही दान करण्याचा निर्णय घेतला. 

 

अधिक वाचा :  असे आहेत अँजिओप्लास्टीचे शरीरावर होणारे परिणाम


अवयवदान केलेल्या काही सेलिब्रिटींची लिस्ट पाहुया.

1.जया बच्चन
2.आमिर खान
3.आर माधवन
4.सलमान खान
5.प्रियांका चोप्रा
6.इरफान खान
7.ऋषी कपूर
8.रणबीर कपूर
9.आलिया भट्ट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी