नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटर हँडलवर शेअर झाले अभिनेत्री मौनी रॉयचे ग्लॅमरस फोटोज

NSE shares Mouni Roy photos: एनएसई म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटर अकाऊंटवरुन अभिनेत्री मौनी रॉयचे ग्लॅमरस फोटोज ट्विट झाले. ही चूक लक्षात येताच फोटोज तात्काळ डीलिट करण्यात आले.

national stock exchange shares sizzling photos of mouni roy on twitter
NSEच्या ट्विटर हँडलवर शेअर झाले अभिनेत्रीचे ग्लॅमरस PHOTOS  |  फोटो सौजन्य: Instagram

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच मौनी रॉयचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोज चक्क नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पोस्ट करण्यात आल्याचं समोर आलं आहे. असं म्हटलं जात आहे की, चुकून हे फोटोज पोस्ट झाले आहेत. मात्र, सोशल मीडियात या फोटोजवरुन वातावरण चांगलेच तापले आणि अनेकांनी मीम्स सुद्धा तयार केले. ट्विटर युजर्स एनएसईच्या या चुकीबद्दल खिल्ली उडवत आहेत.

आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन शेअर झालेले मौनी रॉयचे हे फोटोज एनएसईने हटवले असून त्याबद्दल माफी सुद्धा मागितली आहे. एनएसईने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेले हे फोटोज काही क्षणातच व्हायरल झाले. या फोटोजमध्ये अभिनेत्री मौनी रॉय ब्लॅक ड्रेसध्ये दिसत आहे.

आपल्या ट्विटर हँडलवरुन अभिनेत्री मौनी रॉयचे फोटोज पोस्ट झाल्याचे लक्षात येताच एनएसईने फोटोज हटवले आणि ट्विट करत म्हटलं, "दुपारी १२.२५ मिनिटांनी एनएसईच्या हँडलवरुन चुकून हे फोटोज पोस्ट झाले. एनएसईचं अकाऊंट हाताळणाऱ्या एजन्सीकडून हे चुकून झालं आहे. एनएसईचं अकाऊंट हॅक झालेलं नाहीये. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत."

एनएसईच्या ट्विटर हँडलवरुन अभिनेत्री मौनी रॉयचे फोटोज शेअर होताच ट्विटर युजर्सनेही खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. हे ट्विट डीलिट करण्यात आले असले तरी युजर्सकडून स्क्रिनशॉट शेअर करुन कमेंट्स करु लागले.

एका युजरने म्हटलं, जर वीकेंडलाही कर्मचाऱ्याला कामावर बोलवले तर हेच होईल. एनएसईने या प्रकरणी दिलगीरी व्यक्त केली असली तरी युजर्स ट्रोल करत आहेत आणि मीम्स सुद्धा शेअर करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी