Nawazuddin Siddhiqi : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याचा भाऊ शमसुद्दीन आणि आधीची पत्नी अंजना पांडे उर्फ आलिया सिद्दीकी यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. वकिलामार्फत दाखल करण्यात आलेल्या या खटल्याची सुनावणी 30 मार्च रोजी मुंबई हायकोर्टात होणार आहे. नवाजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा आपल्यावर लावलेले सर्व निराधार आरोप मागे घ्यावेत आणि लेखी माफी मागावी अशी मागणीही केली आहे. याप्रकरणी नवाजुद्दीनने 100 कोटी रुपयांची भरपाईही मागितली आहे.
अधिक वाचा :चाहत्यांची मनं जिंकणारी रश्मिका मंदाना
नवाजुद्दीन सिद्दीकीने याचिकेत म्हटले आहे की, 2008 मध्ये त्याने त्याचा धाकटा बेरोजगार भाऊ शमसुद्दीन याला व्यवस्थापक म्हणून कामावर घेतले होते. त्यांच्या खात्याचे सर्व काम तो पाहत असे. शमसुद्दीनने अनेकवेळा आपल्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप नवाजने केला आहे.
भावाने फसवणूक करून अनेक मालमत्तांसह 14 महागडी वाहने खरेदी केली. नवाजुद्दीन सिद्दीकीने आलियावर आरोप केला आहे की, त्याची आधीची पत्नी अंजना पांडे उर्फ आलिया हिचे आधीच लग्न झाले होते, मात्र तिने मला अविवाहित असल्याचे खोटे बोलून नेहमी अंधारात ठेवले. अभिनेत्याने आलिया आणि शमसुद्दीनवर 21 कोटींची फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे.
अधिक वाचा :डिलिव्हरीनंतर 'हे' उपाय करून अनुष्का काही दिवसांमध्येच झाली स्लिम फिट
याप्रकरणी नवाजुद्दीनचा धाकटा भाऊ शमसुद्दीन याने सोशल मीडियावर एक पत्र जारी करून त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत. शमसुद्दीनने पत्रात लिहिलं आहे की, तुम्ही फक्त बातम्या बनवण्यासाठी पैसे खर्च करत आहात का? एखाद्या व्यक्तीचे मूल्य त्याच्या सभोवतालच्या लोकांना कळते. जे आपल्या सर्वांना माहित आहे. तुम्ही माझी 11 सुवर्ण वर्षे परत करू शकता का? माझा दोष आहे की तुझ्यापासून वेगळे होऊन मी सत्याला पाठिंबा दिला आणि माझा हक्क मागितला. माझे तारुण्य आणि 11 वर्षे परत करण्यासाठी मी तुमच्याविरुद्ध उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.