Nawazuddin Siddiqui's first look from Haddi : नवाझुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) हड्डी (Haddi) या सिनेमातील त्याचा लूक चर्चेचा विषय ठरत आहे. नवाझुद्दीनचा मेकओव्हर पाहून सारेच आश्चर्यचकीत झालेले आहेत. या लूकमध्ये तो नवाझुद्दीन आहे ओळखूसुद्धा येत नाही. विशेष म्हणजे त्याचा हा लूक पाहून कोणाची आठवण होत असेल तर ते म्हणजे अभिनेत्री अर्चना पूरणसिंग यांची. तिच हेअर स्टाईल. सेम टू सेम. डिट्टो असं म्हणायला हरकत नाही. नवाजने त्याच्या इन्स्टाग्रामवर सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. (Nawazuddin Siddiqui's Haddi look comparision Archana puran singh reacted to Comparision)
नवाझुद्दीन सिद्दीकीने नेहमीच काहीतरी हटके करत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सिनेमातील त्याच्या भूमिकांमध्ये कायम वैविध्य पाहायला मिळतं. आता त्याच्या आगामी 'हड्डी'सिनेमाच्या मोशन पोस्टरने सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
अधिक वाचा : 10वी पास सोनाली फोगाटकडे 50 तोळे सोनं अन् कोट्यवधीची संपत्ती
मोशन टीझरमध्ये वेअरहाऊस दिसत आहे. जिथे एका सोफ्यावर नवाझुद्दीन सिद्दीकी फिमेल लूकमध्ये बसलेला दिसत आहे. त्याच्याजवळ रक्ताचे डाग असलेला लोखंडी रॉडही ठेवण्यात आला आहे.
त्यांच्या लूकबद्दल प्रतिक्रिया देताना, नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी म्हटले आहे की, "आजवर मी वैविध्यपूर्ण आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तो प्रत्येका सिनेमा माझ्यासाठी स्पेशलच होता. पण 'हड्डी'हा एक अनोखा सिनेमा असणार आहे. कारण, आजवर मी कधीहीन साकारलेली भूमिका या सिनेमात माझ्या वाट्याला आलेली आहे.
एक अभिनेता म्हणून माझ्या अभिनयाचा कस या सिनेमात लागणार आहे. पुढच्या वाटचालीसाठी हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यासाठी उत्सुक आहे " असं मत नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी मांडलं आहे.
अधिक वाचा : सोनम कपूरचे बाळासह अनिल कपूरच्या घरी जंगी स्वागत
तर दुसरीकडे, "नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत काम करायला मिळणं ही माझ्यासाठी पर्वणीच असल्याच लेखक आणि दिग्दर्शक अक्षत अजय शर्मा यांनी म्हटलं आहे. मोशन टीझर प्रेक्षकांना आवडेल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही सिनेमाच्या शूटिंगसाठी खूपच उत्सुक आहोत" असंही ते म्हणाले. नवाझुद्दीनच्या चाहत्यांनीही त्याच्या या लूकवर कमेंट्स केल्या आहेत.
अधिक वाचा : "रंग है गुलाबी.." म्हणत कपिल शर्माचा न्यू लूक
दरम्यान, नवाझुद्दीनच्या या लूकची अर्चना पूरणसिंग यांच्या लूकशी तुलना करण्यात येत आहे. आता त्यावर स्वत: अर्चना पूरणसिंग यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. अर्चना पूरणसिंग म्हणतात की, या हेअरस्टाईलमुळे नवाझची माझ्याशी तुलना केली जात आहे. नवाझशी तुलना होणं माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लीमेंट असल्याचं अर्चना पूरणसिंग यांनी म्हटलं आहे.