नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केले धक्कादायक खुलासे

बी टाऊन
Updated May 20, 2020 | 13:14 IST | टाइम्स नाऊ हिंदी

नुकतेच नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने घटस्फोटासाठी त्याला कायदेशीर नोटिस पाठवली. आता तिने नवाजच्या कुटुंबियांबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

Nawazuddin Siddiqui
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केले धक्कादायक खुलासे 

थोडं पण कामाचं

  • नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने धक्कादायक खुलासे केले
  • नवाजच्या पत्नीने नवाजच्या भावावर मारहाणीचा आरोपही केला
  • नवाजुद्दीनवरही आरोप केले होते

मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे खासगी आयुष्य सध्या चर्चेत आहे. नुकतीच त्याची दुसरी पत्नी आलियाने त्याला कायदेशीर नोटीस पाठवत घटस्फोटाची मागणी केली. दोघांच्या लग्नाला १० वर्षे झाली. नवाज आणि आलियाला दोन मुले आहेत. तिने नुकताच नवाजसोबत आपले संबंध ठीक नसल्याचे सांगितले होते. आलियाने हे ही सांगितले की तिने घटस्फोटाचा निर्णय अचानक घेतलेला नाही. तर बऱ्याच काळापासून तिला वैवाहिक जीवनात अडचणी येत होत्या.

आता आलियाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे खुलासे केले. या मुलाखतीत तिने नवाजुद्दीनच्या कुटुंबियांवर मानसिक तसेच शारीरिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. नवाजुद्दीन आणि आलियाची बऱ्याच वेळेस भांडणे होत मात्र त्याने कधी तिच्यावर हात उचलला नाही. आलियाने बॉलिवूड लाईफला सांगितले, नवाजुद्दीनच्या भावाने तिला मारले होते. त्याची आई, भाऊ आणि वहिनी आमच्यासोबत मुंबईत राहत होते. मी बऱ्याच वर्षांपासून छळ सहन करत आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीने याच कारणामुळे त्याला सोडले होते. हा एक पॅटर्न आहे. आलियाने नवाजुद्दीनच्या कुटुंबातील लग्नाबाबत अनेक खुलासे केले.

आलिया व्यतिरिक्त त्यांच्या घरात पत्नींकडून आधीच सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि चार घटस्फोट झाले आहेत. हे पाचवे प्रकरण आहे. इतकच नव्हे आलियाने हेही सांगितले की नवाजुद्दीन त्या लोकांपैकी एक आहे जो प्रसिद्धी हाताळू शकत नाही. तो आपल्या मुलांनाही भेटत नव्हता. तीन ते चार महिन्यांपूर्वी तो शेवटचा आपल्या मुलांना भेटला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Finally some time to chill with my Family in Melbourne

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui) on

आलियाने अधिकृत विधान करताना सांगितले की, तिने आपले नाव बदलले आहे आणि ती पुन्हा आपले जुने हिंदू नाव अंजना किशोर पांडे लावत आहे. नवाजुद्दीनशी लग्न केल्यानंतर आलियाने कुटुंबाला प्राधान्य देत आपले नाव बदलले होते आणि सिद्दीकी हे नाव लावले होते.

२००९मध्ये झाले होते लग्न

नवाजुद्दीन आणि आलिया यांचे २००९मध्ये लग्न झाले होते. या दोघांना दोन मुले आहेत. याआधी नवाजुद्दीनने शीबाशी लग्न केले होते मात्र काही दिवसांतच हे लग्न मोडले.

७ मे रोजी पाठवली नोटीस

७ मे रोजी आलियाने घटस्फोटाची नोटीस ईमेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नवाजुद्दीनला पाठवली. लॉकडाऊनमुळे स्पीड पोस्टची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे तिने ही नोटीस व्हॉट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातून पाठवली. ही नोटीस आलियाने तिचे वकील अभय सहाय यांच्याद्वारे पाठवली आहे. आलियाच्या वकिलांचे म्हणणे आहे की, अद्याप नवाजुद्दीनने त्याच्याकडून कोणतेही उत्तर दिलेले नाही.

नवाजुद्दीन गेल्या अनेक वर्षापासून बॉलिवूडमध्ये काम करतोय. त्याने अनेक जबरदस्त सिनेमांमध्ये काम केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी