NCB ची अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापेमारी; चौकशीसाठी दोन वाजता हजर राहण्याचा समन्स

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 21, 2021 | 14:31 IST

लिवूडची नवोदित अभिनेत्री आणि अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेच्या घरी एनसीबीने छापा टाकत झाडाझडती घेतली. एवढंच नाहीतर दुपारी दोन वाजता चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अनन्या पांडेला एनसीबीने समन्स बजावले आहे. 

NCB actress Ananya Pandey's house raid
NCB ची अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापेमारी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पथक घरी गेलं होतं - एनसीबी
  • अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे.
  • अनन्याच्या घरी कोणत्याही प्रकारचे शोधमोहीम राबवली गेली नाही. तिला फक्त समन्स देऊन चौकशीसाठी बोलावले आहे.

मुंबई :मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी गेल्या 18 दिवसांपासून बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खान अटकेत आहे. अशातच आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलाची 10 मिनिटांसाठी भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीने अभिनेता शाहरुख खान यांच्या घरात छापेमारी केली. 
त्यानंतर बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री आणि अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेच्या घरी एनसीबीने छापा टाकत झाडाझडती घेतली. एवढंच नाहीतर दुपारी दोन वाजता चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अनन्या पांडेला एनसीबीने समन्स बजावले आहे. 


दरम्यान, आज शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून अनन्या पांडेच्या घरीही छापेमारी करण्यात आली. याशिवाय, दुपारी 2 वाजता अनन्या पांडेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. 

आर्यनच्या व्हॉट्स अप चॅटवरील अभिनेत्री अनन्याच का?  

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनन्याच्या घरी कोणत्याही प्रकारचे शोधमोहीम राबवली गेली नाही. तिला फक्त समन्स देऊन चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबीला आर्यन खान आणि नवोदित बॉलिवूड अभिनेत्री यांचे व्हॉट्सअप चॅट मिळाले आहेत. या गप्पांमध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. या चॅटच्या आधारे, एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली होती. अशा परिस्थितीत ती अभिनेत्री अनन्या पांडे आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मन्नतवर एनसीबीचं पथक 

मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. अशात एनसीबीकडून याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. अशातच आज एनसीबीच्या पथकाने शाहरुख खानच्या राहत्या घरी छापा टाकला, अशी माहिती मिळाली होती. परंतु, एनसीबीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं. परंतु, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीनं सर्च वॉरंटसह मन्नतवर धडक दिली असून शाहरुखच्या घरी एनसीबीकडून सर्च ऑपरेशन केलं जाणार आहे. 

तुरुंगात शाहरुख-आर्यनची 10 मिनिटं भेट 

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा अर्ज काल सत्र न्यायालयाकडून फेटाळला गेला. त्यानंतर आज आर्यनची भेट घेण्यासाठी शाहरुख खान स्वत: आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. शाहरुखनं दहा मिनिटं आर्यनशी संवाद केला. कालही जामीन अर्ज फेटाळल्यानं क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये राहावं लागणार आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी