NCB ची अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापेमारी; चौकशीसाठी दोन वाजता हजर राहण्याचा समन्स

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 21, 2021 | 14:07 IST

लिवूडची नवोदित अभिनेत्री आणि अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेच्या घरी एनसीबीने छापा टाकत झाडाझडती घेतली. एवढंच नाहीतर दुपारी दोन वाजता चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अनन्या पांडेला एनसीबीने समन्स बजावले आहे. 

NCB actress Ananya Pandey's house raid
NCB ची अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापेमारी  |  फोटो सौजन्य: Indiatimes

मुंबई :मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी गेल्या 18 दिवसांपासून बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खान अटकेत आहे. अशातच आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलाची 10 मिनिटांसाठी भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीने अभिनेता शाहरुख खान यांच्या घरात छापेमारी केली. 
त्यानंतर बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री आणि अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेच्या घरी एनसीबीने छापा टाकत झाडाझडती घेतली. एवढंच नाहीतर दुपारी दोन वाजता चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अनन्या पांडेला एनसीबीने समन्स बजावले आहे. 


आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून बॉलिवूडच्या आताच्या यंग सिनेकलाकारांमधील प्रसिद्ध अशा अनन्या पांडेच्या घरीही छापेमारी करण्यात आली. याशिवाय, दुपारी 2 वाजता अनन्या पांडेला चौकशीसाठी एनसीबीनं समन्स बजावलंय. त्यामुळे एनसीबी बॉलिवूडमधील आणखी कोण-कोणत्या बड्या चेहऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सिनेसृष्टीसह सामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी