रिया, शौविकचा बालमित्र सूर्यदीपला अटक

NCB arrested Suryadeep Malhotra in Drugs Case अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि शौविक या दोघांचा बालमित्र सूर्यदीप मल्होत्रा याला अटक केली.

NCB arrested Suryadeep Malhotra in Drugs Case
रिया, शौविकचा बालमित्र सूर्यदीपला अटक 

थोडं पण कामाचं

  • रिया, शौविकचा बालमित्र सूर्यदीपला अटक
  • एनसीबीने मुंबई आणि गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून धरपकड केली
  • सात ड्रग पेडलरना अटक

मुंबईः अंमली पदार्थ प्रकरणी (Drugs Case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau - NCB) रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) या दोघांचा बालमित्र सूर्यदीप मल्होत्रा (Suryadeep Malhotra) याला अटक केली. सूर्यदीप शौविकपर्यंत अंमली पदार्थ पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. एनसीबीच्या कारवाईमुळे रिया आणि शौविकच्या अंमली पदार्थांच्या जाळ्याविषयी बरीच महत्त्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे. (NCB arrested Suryadeep Malhotra in Drugs Case)

एनसीबीने शौविकचे मोबाइल चॅट तपासले. यात शौविक आणि सूर्यदीप यांच्यात अंमली पदार्थांच्या संदर्भात बरीच चर्चा झाल्याचे पुरावे हाती आले. याच कारणामुळे एनसीबीने सूर्यदीपला अटक केली. तो अंमली पदार्थांची वाहतूक करणारा एक ड्रग पेडलर असल्याचा एनसीबीला संशय आहे. सूर्यदीपची एनसीबीच्या मुंबईतील ऑफिसमध्ये चौकशी सुरू आहे. 

याआधी एनसीबीने मुंबई आणि गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून धरपकड केली. एकूण सात ड्रग पेडलरना कोर्टात सादर करणार असल्याची माहिती एनसीबीने दिली. करमजीत सिंह आनंद उर्फ केजे, ड्वेन फर्नांडीस, संकेत पटेल, अंकुश अरजेंका, संदीप गुप्ता, आफताब फतेह अन्सारी आणि क्रिस कोस्टा अशी अटक केलेल्यांची नावं आहे. सूर्यदीपलाही कोर्टात सादर केले जाण्याची शक्यता आहे.

रियाने एनसीबीला दिलेल्या माहिती २५ बॉलिवूड कलाकारांची नावं घेतली. यात सारा अली खान (sara ali khan) आणि रकुलप्रीत सिंग (rakulpreet singh) या दोन अभिनेत्रींचा तसेच डिझायनर (designer) सिमोन खंबाटाचा (simone khambatta) समावेश आहे. एनसीबीसमोर रियाने जी नावं घेतली आहेत त्यापैकी सीमोनशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅट एनसीबीच्या हाती आहे. यात अंमली पदार्थांचा उल्लेख आहे. सारा अली खान सुशांतसोबत एका खासगी चार्टर प्लेनने बँकॉकला गेली होती, अशीही माहिती एनसीबीच्या हाती आली आहे. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे. सारा आणि रकुलप्रीतने अंमली पदार्थांचे सेवन केल्याची माहिती रियाने दिली. एनसीबीने रियाने दिलेल्या माहितीआधारे कलाकारांच्या ए, बी आणि सी अशा तीन याद्या तयार केल्या आहेत. यातील ए लिस्टमध्ये (ए यादी) ज्या कलाकारांची नावं आहेत त्यांची लवकरच चौकशी सुरू होणार आहे. 

कलाकारांना हवे तेव्हा सहजतेने अंमली पदार्थ कसे मिळत होते, या पाठीमागे दाऊद टोळीचा अथवा अन्य कोणत्या बड्या गँगस्टरचा हात आहे का, हे तपासले जाणार आहे. एनसीबीच्या यादीत केंद्र सरकारवर अनेकदा टीका करणाऱ्या बड्या निर्मात्याचेही नाव असल्याचे वृत्त आहे. या निर्मात्याला चित्रपट निर्मितीसाठी दाऊदच्या गँगकडून मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा होतो, अशी माहिती मिळाली आहे. एनसीबी इतरांना अंमली पदार्थांचे व्यसन लावणाऱ्या कलाकारांचाही शोध घेत आहे. 

अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबीची चौकशी सुरू असतानाच अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआयची (Central Bureau of Investigation - CBI) तसेच सुशांतच्या पैशांचा गैरवापर झाला की नाही याचा तपास करण्यासाठी इडीची (Enforcement Directorate - ED) चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी