ड्रग प्रकरणी टीव्ही स्टार गौरव दीक्षित आणि त्याच्या मैत्रीणीचा शोध सुरू

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणी बॉलिवूड अभिनेता एजाझ खान याला अटक केली. एजाझला अटक केल्यानंतर लोखंडवाला संकुलात राहणाऱ्या टीव्ही स्टार गौरव दीक्षित याच्या घरावर छापा मारण्यात आला.

NCB recovered drugs from actor Gaurav Dixit's house
ड्रग प्रकरणी टीव्ही स्टार गौरव दीक्षित आणि त्याच्या मैत्रीणीचा शोध सुरू 

थोडं पण कामाचं

  • ड्रग प्रकरणी टीव्ही स्टार गौरव दीक्षित आणि त्याच्या मैत्रीणीचा शोध सुरू
  • गौरवच्या घरातून ड्रगचा साठा आणि ड्रग पॅकिंगचे साहित्य जप्त
  • बॉलिवूड अभिनेता एजाझ खान याला अटक

मुंबईः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणी बॉलिवूड अभिनेता एजाझ खान याला अटक केली. एजाझला अटक केल्यानंतर लोखंडवाला संकुलात राहणाऱ्या टीव्ही स्टार गौरव दीक्षित याच्या घरावर छापा मारण्यात आला. गौरवच्या घरातून ड्रगचा मोठा साठा जप्त करण्यात आला. मात्र गौरव दीक्षित आणि त्याची डच मैत्रीण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पथक घरी येण्याआधीच पळून गेल्याचे उघड झाले. सध्या टीव्ही स्टार गौरव दीक्षित आणि त्याच्या मैत्रीणीचा शोध सुरू आहे. (NCB recovered drugs from actor Gaurav Dixit's house after Ajaz Khan's arrest, Gaurav Dixit and his girlfriend absconding)

ड्रग पेडलर शादाब बटाटाच्या अटकेनंतर एजाझ खानचे नाव समोर आले. राजस्थानहून मुंबईत परतलेल्या एजाझला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तातडीने अटक केली. एजाझने मुंबईच्या अंधेरीतील लोखंडवाला संकुलात (लोखंडवाला कॉम्प्लेक्स) राहणाऱ्या टीव्ही स्टार गौरव दीक्षितची माहिती दिली. माहिती मिळताच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गौरवच्या घरावर छापा मारला. 

गौरवच्या घरातून एमडी, एमडीएमए आणि हशीश अशा महागड्या ड्रगचा साठा जप्त करण्यात आला. ड्रग पॅकिंगचे साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. टीव्ही स्टार गौरव दीक्षित घरात बसून ड्रग पॅकेजिंगचा व्यवसाय करत होता. ड्रगची लहान-मोठी पाकिटे तयार करत होता.

गौरव आणि त्याची मैत्रीण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पथक घरी येण्याआधीच पळून गेले होते. यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दरवाजा तोडून गौरवच्या घरात छापा टाकावा लागला. सध्या पळून गेलेल्या टीव्ही स्टार गौरव दीक्षित आणि त्याच्या मैत्रीणीचा शोध सुरू असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दिली. 

टीव्ही स्टार गौरवने मरुधर एक्सप्रेस आणि डायरी ऑफ अ बटरफ्लाय या सिनेमांत काम केले आहे. तो निवडक टीव्ही शोमध्येही सहभागी झाला होता. 

ड्रग प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पथक तपासणीसाठी इमरतीच्या आवारात आले त्यावेळी गौरव आणि त्याची मैत्रीण इमारतीच्या आवारातच वावरत होते. पुढच्या अडचणी ओळखून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई करण्याआधीच गौरव आणि त्याची मैत्रीण पळून गेले आणि अद्याप घरी परतलेले नाही. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय कार्यालयाचे प्रमुख समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली. 

याआधी अभिनेता आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक असलेल्या एजाझची मंगळवारी आठ तास चौकशी झाली होती. या चौकशीनंतर बुधवारी बॉलिवूड अभिनेता एजाझ खान याला अटक करण्यात आली. 

माझ्या घरातून फक्त चार झोपेच्या गोळ्या मिळाल्या होत्या. माझ्या पत्नीचा गर्भपात झाला होता. तणावात असताना ती या गोळ्यांचा वापर करत होती; असे एजाझने सांगितले. त्याने अटक झाल्यानंतर निर्दोष असल्याचा दावा केला. मात्र एका सप्लायरने दिलेल्या ठोस माहितीआधारे एजाझ आणि गौरव विरोधात कारवाई केल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी