Mumbai Drug Case : क्रूझ ड्रग्स प्रकरणी अनन्या पांडेला पुन्हा एनसीबीचं समन्स; चौकशीसाठी आज 11 वाजता हजर राहण्याचे निर्देश

बी टाऊन
भरत जाधव
Updated Oct 25, 2021 | 10:33 IST

अभिनेत्री अनन्या पांडेला (Actress Ananya Pandey) आज पुन्हा एनसीबीने (NCB) चौकशीसाठी बोलवले आहे. सकाळी 11 वाजता तिला एनसीबीसमोर हजर राहावे लागणार आहे.

NCB summons Ananya Pandey again in cruise drugs case
Mumbai Drug Case : क्रूझ ड्रग्स प्रकरणी अनन्या पांडेला पुन्हा एनसीबीचं समन्स  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • अनन्या पांडेला ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते.
  • धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर्यन खानसोबत अनन्या पांडे शिकली आहे.

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेला (Actress Ananya Pandey) आज पुन्हा एनसीबीने (NCB) चौकशीसाठी बोलवले आहे. सकाळी 11 वाजता तिला एनसीबीसमोर हजर राहावे लागणार आहे. शुक्रवारी तिची साडेतीन तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी अनन्या पांडेला ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे.

मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते. दरम्यान, एनसीबी (NCB) सध्या मुंबईतीस क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा कसून तपास करत आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत आहे. दरम्यान प्रभाकर साईलने केलेल्या आरोपामुळे आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाला वेगळं वळण आलं. आजच्या चौकशीनंतर आता या प्रकरणाला नवीन वळण येत हे का प्रश्न उपस्थित होत आहे. 

चौकशीच्या पहिल्या दिवशी काय झालं?

गुरुवारी, जेव्हा अनन्या पांडे तिचे वडील चंकी पांडे यांच्यासह NCB च्या झोनल हेड क्वार्टरमध्ये दुपारी 4 च्या सुमारास पोहोचली, तेव्हा चंकी पांडेला चौकशीतून बाहेर बसवले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास अधिकारी व्ही.व्ही.सिंग, झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि एका महिला अधिकाऱ्याने अनन्या पांडेची चौकशी केली.

एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, अनन्या पांडेने सांगितले की, ती धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर्यन खानसोबत शिकली आहे आणि ती आर्यन खानची बहीण सुहानाची जवळची मैत्रीण आहे. यामुळे आर्यन, सुहाना आणि अनन्या हे एकमेकांचे कौटुंबिक मित्र आहेत. शूटिंग शेड्यूल व्यतिरिक्त, जेव्हा ती घरी राहते, तेव्हा ते सर्वजण एकत्र येतात, ज्यामध्ये शाळेतील मित्रांचा एक सर्कल देखील आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान अनन्याने NCB ला व्हिडीओ चॅटबद्दल सांगितले की, हे चॅट त्यावेळी सिगारेट आणण्याच्या संदर्भात होती, बराच वेळ निघून गेला आहे, यामुळे तिला नक्की कोणत्या संदर्भात ही गोष्ट आठवत नाही आणि वीड हे एक ड्रग्ज आहे याची त्यांना जाणीव नव्हती.

समीर वानखेडेंनी अनन्या पांडेला फटकारलं

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेत्री अनन्या पांडे हिला चांगलेच फटकारले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चौकशीसाठी उशिरा दाखल झाल्याने समीर वानखेडे चांगलेच संतापले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी