Neena Gupta : नीना गुप्तांवर वेळ आली लेक मसाबाची माफी मागायची, हे कारणं आलं समोर

बी टाऊन
Updated Jul 29, 2022 | 17:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Neena Gupta On Daughter Masaba Gupta: 'मसाबा मसाबा सीझन 2' मध्ये (Masaba Masaba Season 2)  नीना गुप्ता (Neena Gupta) तिची मुलगी मसाबा गुप्तासोबत (Masaba Gupta) दिसणार आहे. पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, चाहत्यांनाही दुसऱ्या सीझनकडून अपेक्षा आहेत.

Neena Gupta apologised to her daughter Masaba Gupta because of is this reason
नीना गुप्तांनी मागितली लेकीची माफी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नीना गुप्तांनी मागितली मसाबा गुप्ताची माफी
  • मसाबा मसाबा सीझन 2 प्रेक्षकांच्या भेटीला
  • मसाबा मसाबा सीझन 2 मध्ये आई-मुलीची जोडी धमाल करणार.

Neena Gupta Apologised To Masaba Gupta:  नीना गुप्ता (Neena Gupta) लवकरच 'मसाबा मसाबा सीझन 2' मध्ये (Masaba Masaba Season 2)  दिसणार आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नीना गुप्ता आणि मसाबा गुप्ता (Masaba Gupta) आई मुलीच्या भूमिकेत दिसणार आहेत ज्या खऱ्या आयुष्यातही आई आणि मुलगी आहेत. 'मसाबा मसाबा' स्ट्रीम होण्यापूर्वी नीना गुप्ता यांनी आपल्या आयुष्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. अलीकडे, त्यांनी आपली चूक कबूल केली की आपल्या मुलीच्या अभिनय कारकीर्दीला थांबवण्याचा आयुष्यातील त्यांचा सर्वात मोठा चुकलेला निर्णय होता. 


मसाबा मसाबा सीझन 2 मध्ये आई-मुलीची जोडी धमाल करणार.


एका न्यूज पोर्टलशी बोलताना नीनाने खुलासा केला की, जेव्हा तिने शोचा पहिला सीझन पाहिला तेव्हा मसाबाचे काम पाहून तिला खूप समाधान वाटले. मसाबाला अभिनय क्षेत्रात येण्यापासून रोखण्यासाठी तिने आपल्या मुलीची माफीही मागितल्याची कबुलीही या अभिनेत्रीने दिली आहे. आता तिला वाटते की मसाबा एक अभिनेत्री म्हणून खूप काही करू शकते. नीनाच्या मते, ती मसाबाची सर्वात मोठी टीकाकार आहे.

अधिक वाचा : रात्री केस कापणे का अशुभ मानले जाते?, जाणून घ्या कारण

नीना गुप्ता यांना मुलगी मसाबाच्या अभिनयाचा अभिमान वाटतो. 


मसाबाने एक पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सध्या तिला फक्त OTT वर काम करायचे आहे. अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याचा विचार केलेला नाही. मसाबा मसाबा मधील तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. सध्या ती अभिनेत्री म्हणून स्वत:ला तयार करत आहे. जेव्हा ती यात परफेक्ट होईल, तेव्हा ती बॉलिवूड सिनेमांचाही विचार करेल.


सोनम नायर दिग्दर्शित 'मसाबा मसाबा सीझन 2' (Masaba Masaba Season 2)  या वेबसीरिजमध्ये नीना गुप्ता (Neena Gupta) आणि मसाबा गुप्ता (Masaba Gupta) व्यतिरिक्त नील भूपलम, रयताशा राठौर, कुशा कपिला, करीमा बेरी, बरखा सिंह, राम कपूर आणि अरमान खेरा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

अधिक वाचा :  मुंबई विमानतळाजवळील 48 इमारती पाडण्यात येणार, डीजीसीएचा आदेश

मसाबा मसाबा सीझन 2 (Masaba Masaba Season 2) मध्ये मसाबा गुप्ताचे वैयक्तिक आयुष्य, व्यावसायिक जीवन, तिचं काम प्रेम आणि आयुष्याचा समतोल साधताना उडणारी तारांबळ, तो संघर्ष हे सारं काही या सीझनमध्ये दाखवण्यात येणार आहे. 'मसाबा-मसाबा सीझन 1' 2020 मध्ये रिलीज झाला होता, आता जवळपास दोन वर्षांनंतर, आई-मुलीची जोडी सीझन 2 वर वर्चस्व गाजवण्यास सज्ज आहे. मसाबा मसाबा सीझन 2 नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी