माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्डस् आणि नीना गुप्तांची मुलगी मसाबाच्या घटस्फोटावर अखेर नीना यांनी मौन सोडलं

बी टाऊन
Updated Apr 18, 2019 | 16:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

क्रिकेटपटू विवियन रिचर्डस् आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ताने गेल्या महिन्यात घटस्फोट निर्माता मधु मंटेनापासून घटस्फोट घेतला. या सगळ्यावर अखेर नीना गुप्ता व्यक्त झाल्या त्या या अश्या.

Neena Gupta opens up on daughter Masaba's divorce
लेक मसाबाच्या घटस्फोटावर नेमकं काय म्हणाल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता वाचा सविस्तर  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: फॅशन डिसाईनर मसाबा गुप्ता हे फॅशन जगातलं एक नावाजलेलं नाव आहे. क्रिकेटपटू विवियन रिचर्डस् आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिच्या संबंधित असलेल्या बातम्या कोणत्याही स्टार प्रमाणेच वाऱ्याच्या वेगाने पसरतात. असंच झालं जेव्हा तिच्या घटस्फोटाची बातमी आली. मसाबा आणि निर्माता मधु मंटेना 2015 साली विवाहबंधनात अडकले. पण अवघ्या दोन वर्षात त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काही महिने तात्पुरते वेगळे राहुन पाहिल्यावर अखेर या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि तो जाहीर करण्यात आला. या सगळ्यावर मसाबाची आई ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी मात्र मौन पाळलं होतं. पण अखेर त्यांनी एका चॅट शोच्या दरम्यान या सगळ्यावर व्यक्त होण्यास पसंत केलं आणि इतके महिने पाळलेलं मौन अखेर त्यांनी सोडलंच.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

ज्येष्ठ सीने क्रिटिक राजीव मसंद यांच्या 'वूमन वी लव्ह' या चॅट शोमध्ये नीना या पाहुण्या म्हणून हजर होत्या. या वेळेस राजीव यांनी हा विषय काढला आणि नीना यांनी अखेर त्यावर बोलण्याचं ठरवलं. त्या म्हणाल्या की “कुठल्याही आईला बसला असता तितकाच धक्का मला सुद्धा बसला, एका नॉर्मल आईप्रमाणेच मी सुद्धा तिला कोणताही निर्णय घाईत घेऊ नकोस असाच सल्ला दिला, नीट विचार कर आणि ठरव” पुढे त्या असं ही म्हणाल्या की त्या आणि त्यांचे पती विवेक मेहरा दोघांना सुद्धा मधु खूप आवडायचा, आजही आवडतो कारण तो एक चांगला माणूस आहे, पण जर नाही जमू शकलं तर नाही जमू शकलं त्याला काय करता येणार आहे. असं म्हणत एक आई या शोमध्ये आपल्या मनातील दुःख व्यक्त करताना दिसली. याच चॅट शो दरम्यान हा विषय सुरु असताना त्या पुढे असं म्हणाल्या की, “आम्ही म्हणालो तिला विचार कर यावर, असं नाहीये की त्यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतला, त्या दोघांनी खूप विचार केला या सगळ्यालर, मला प्रचंड मोठा धक्का बसला.”

मसाबा आणि मधु यांच्या नात्यात दुरावा का आला याचं स्पष्टीकरण किंवा कारणं अद्यापही कळू शकलेली नाहीत. अनेक वर्ष डेट केल्यानंतर 2015 साली अखेर या दोघांनी आपल्या नात्यावर शिक्का मोर्तब करत लग्न केलं होतं. पण दोन वर्षातंच त्यांनी पुढे विभक्त होण्याचं जाहीर केलं आणि गेल्या महिन्यात अखेर घटस्फोट झाला सुद्धा, त्यावेळी दोघांनी मीडियाला आणि सगळ्यांना विनंती केली होती की या प्रसंगात त्यांना थोडा वेळ एकटं राहु द्यावं आणि फार काही विचारु नये आणि त्यांना हवी असलेली प्रायव्हसी द्यावी. दोघांकडून अधिकृतपणे हे जाहीर करत आम्ही तरीही एकमेकांचा आदर करतो असं दोघांनीही नमूद केलं होतं.

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्डस् आणि नीना गुप्तांची मुलगी मसाबाच्या घटस्फोटावर अखेर नीना यांनी मौन सोडलं Description: क्रिकेटपटू विवियन रिचर्डस् आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ताने गेल्या महिन्यात घटस्फोट निर्माता मधु मंटेनापासून घटस्फोट घेतला. या सगळ्यावर अखेर नीना गुप्ता व्यक्त झाल्या त्या या अश्या.
Loading...
Loading...
Loading...