Ranbir and Alia wedding : नीतू कपूरने गायले सुनेचे गुणगान, म्हणाली- 'रणबीर आणि आलिया एकमेकांना शोभून दिसतात'

बी टाऊन
Updated Apr 09, 2022 | 15:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Neetu Kapoor on Alia Ranbir Wedding: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक आणि गोंडस जोडपे आहेत. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असून १४ तारखेला लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Neetu Kapoor saying- 'Ranbir and Alia are made for each other'
नीतू कपूर यांनी गायले सुनेचे गुणगान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक जोडप्यांपैकी एक आहे
  • अभिनेत्री आलिया भट्टचे काका रॉबिन भट्ट यांनी लग्नाची तारीख निश्चित केली आहे.
  • हे दोन्ही स्टार्स १४ एप्रिलला आरके हाऊसमध्ये लग्न करणार आहेत.

Neetu Kapoor on Alia Ranbir Wedding: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक कपल आहेत. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2018 मध्ये अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात रणबीर आणि आलिया एकत्र दिसले होते, त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. 
आता दोघेही अखेर लग्न करणार असल्याने आलिया आणि रणबीरचे चाहते सातव्या आसमानावर आहेत. रणबीर आणि आलिया १४ तारखेला लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. अद्याप तारखेबाबत कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

अभिनेत्री आलिया भट्टचे काका रॉबिन भट्ट यांनी लग्नाची तारीख सांगितली आहे. रॉबिन भट्ट म्हणतात 14 तारखेला लग्न होणार आहे. रॉबिन भट्ट यांनी एका मुलाखतीत सांगितले की, '13 तारखेला मेहंदी आहे आणि 14 तारखेला लग्न आहे.' दोघांच्या लग्नामुळे त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक खूप खुश आहेत. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना रणबीरची आई नीतू कपूर यांनीही आपला आनंद व्यक्त केला. दोघांच्या लग्नाच्या प्रश्नावर नीतू कपूर म्हणाली, आलिया खूप गोड मुलगी आहे. मला ती खूप आवडते. 
ते दोघे (आलिया-रणबीर) एकमेकांसाठी बनलेले आहेत. दोघेही बरेचसे सारखेच आहेत. 

]

अधिक वाचा : रामनवमी निमित्त सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा


रणबीर आणि आलियाचे गायले गुणगान

नीतू कपूरनेही आलिया आणि रणबीरमध्ये साम्य असल्याचं सांगितले. ती म्हणाली की रणबीर खऱ्या मनाचा आहे. त्याला राग, इर्षा, मत्सर नाही. त्याच्या मनात नकारात्मकता नाही. आलियाही तशीच आहे. दोघेही खूप आत्मविश्वासी आहेत आणि कोणाचेही नुकसान करू इच्छित नाहीत. मला वाटते ते एकमेकांसाठी बनलेले आहेत.

अधिक वाचा : कर्मचारी सिल्हर ओकवर जाणार असल्याचं पोलिसांना होतं ठाऊक,पण..


नीतू कपूरने लग्नाबाबत माहिती दिली

आलिया-रणबीरच्या लग्नाची माहिती देताना नीतू कपूर म्हणाली, रणबीरचे लग्न आरके हाऊसमध्ये होणार आहे. दुसरीकडे, हा आनंदाचा प्रसंग खाजगी ठेवण्याच्या प्रश्नावर नीतू कपूर  म्हणाल्या की, मी खुश आहे. मी जगाला ओरडून सांगेन की हो, होत आहे लग्न, पण आजची मुलं वेगळी आहेत. त्यांना ही गोष्ट खासगी ठेवायची आहे. 

अभिनेत्री नीतू कपूरबद्दल सांगायचे तर ती तिच्या मुलाच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. इतकंच नाही तर लग्नासाठी त्यांनी त्याचे आउटफिटही तयार केले आहेत. पिंकविलाच्या बातमीनुसार, नीतू कपूर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या आउटफिटमध्ये दिसणार आहे. लग्नाच्या तयारीदरम्यान, नीतूसह काही टीम मेंबर्स स्टोअरमधून रणबीरच्या वांद्र्याच्या घरी लग्नाचे आउटफिट घेऊन जाताना दिसले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी