पाहा, गायिका आणि इंडियन आयडॉल नेहा कक्करच्या मालकीच्या काही महागड्या गोष्टी

बी टाऊन
Updated Apr 26, 2021 | 21:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

नेहा कक्कर बॉलीवूडमधील आघाडीची गायिका म्हणून स्थिरावली आहे. फार थोड्या अवधीत नेहाने मोठे यश मिळवले आहे. या इंडियन आयडॉल -१२ च्या सह-पंचाच्या मालकीच्या काही महागड्या वस्तूंकडे एक नजर टाकूया.

expensive articles owned by Singer Neha Kakkar
नेहाच्या मालकीच्या आलिशना गाड्या आणि घरे 

थोडं पण कामाचं

  • इंडियन आयडॉल नेहा कक्कर
  • नेहाच्या आलिशान गाड्या आणि घरं
  • नेहाची मालमत्ता ३८ कोटी

नवी दिल्ली : इंडियन आयडॉलमधील एक स्पर्धक आणि अन्नू मलिककडून नाकारले जाणे ते इंडियन आयडॉलमध्येच अन्नू मलिकबरोबरच पंचाच्या भूमिकेपर्यत पोचणे, नेहा कक्करने आपल्या करियरमध्ये मोठी झेप घेतली आहे. राखेतून यशापर्यतच्या प्रवासाची नेहाची कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नेहा आज अनेकांसाठी प्रेरणस्थान झाले आहे. मागील काही वर्षांपासून नेहा इंडियन आयडॉलमध्ये पंचाच्या भूमिकेत आहे. इंडियन आयडॉल हा भारतातील लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो आहे. नेहाची बॉलीवूडमधील गाणी, सोलो म्युझिक व्हिडिओ आणि इतर गायकांबरोबर तिने गायलेली गाणी अतिशय लोकप्रिय झाली आहेत आणि इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. तिच्या चाहत्यांच्या संख्येत त्यामुळे मोठी भर पडली आहे.

सोशल मीडियावर नेहा असते सुपर अॅक्टिव्ह

फक्त एवढेच नाही तर आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून नेहा आपल्या चाहत्यांना गायन कौशल्येदेखील शिकवते आणि तिला आतापर्यत असंख्य पुरस्कारदेखील मिळाले आहेत. जानेवारी २०२१ मध्ये नेहाला डायमंड प्ले बटण मिळाले. हे मिळवणारी ती पहिलच भारतीय गायक ठरली. सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह असते आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दल आणि व्यावसायिक आयुष्याबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांसाठी शेअर करायला तिला खूप आवडते.

एका माहितीनुसार २०२१मध्ये नेहाची मालमत्ता ३८ कोटी रुपये इतकी आहे. नेहा कक्करचे करियर घोडदौड करते आहे आणि त्यामुळे तिच्या मालमत्तेतही घवघवीत वाढ होते आहे. तुम्ही जर नेहा कक्करचे फॅन असाल तर तिच्याकडे असलेल्या महागड्या वस्तूंबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. नेहाकडे असलेल्या महागड्या वस्तूंकडे एक नजर टाकूया.

  1. नेहा कक्करने तिच्या गायनाच्या कौशल्याने सर्वांवरच प्रभाव टाकला आहे.
  2. नेहा कक्कर सध्या इंडियन आयडॉल-१२ या रिअॅलिटी शोमध्ये पंचाच्या भूमिकेत आहे
  3. तुम्हाला माहित आहे का की नेहाकडे आलिशान आणि महागड्या कारचा संच आहे.

नेहाच्या मालकीच्या काही महागड्या वस्तू,

कार


नेहाला आलिशान गाड्यांचे वेड आहे. तिच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. नेहाकडे ऑडी क्यू७ आहे जिची किंमत ७० लाख ते १ कोटी रुपयांदरम्यान आहे. २०१८ मध्ये नेहाने मर्सिडिज बेन्झ जीएलएस ३५० घेतली होती. तिची किंमत ८० लाख रुपये आहे. याशिवाय नेहाकडे रेंज रोवर आणि ऑडी कार आहे.

बॅग

नेहाला महागड्या बॅग अत्यंत आवडतात. नेहाकडे अनेक प्रकारच्या महागड्या बॅग आहेत.

आलीशान घरे

फक्त मुंबईतच नाही तर ऋषीकेशमध्येदेखील नेहाचे आलिशान घर आहे. २०२०मध्ये नेहाने तिच्या ऋषीकेशमधील आलिशान घराचे फोटो शेअर केले होते. मुंबईत नेहा पॅनोरामा टॉवरमध्ये राहते. तिच्या या घराची किंमत १.२ कोटी रुपये आहे. लॉकडाऊनमध्ये नेहाने तिच्या घराचे फोटो शेअर केले आहेत. 

सध्या नेहा तिच्या ताज्या मरजायेंगा या गाण्याचे यश साजरे करते आहे. या गाण्यात रुबिना डिलेक आणि अभिनव शुक्ला आहेत. इंडियन आयडॉलमधून असंख्य कलाकारांनी बॉलीवूडमधील आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली आहे. अनेक उद्योन्मुख गायक इंडियन आयडॉलमधून आपले नशीब आजमावत असतात.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी