काँग्रेस आमदाराची मुलगी आहे नेहा शर्मा, लहानपणी झाला होता 'हा' आजार

बी टाऊन
Updated Nov 21, 2020 | 11:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Neha Sharma Birthday: यंगिस्तान, मुबारकां, तुम बिन 2 अशा चित्रपटांमध्ये काम केलेल्या नेहा शर्माचा आज (२१ नोव्हेंबर) वाढदिवस आहे. भागलपूरच्या काँग्रेस आमदाराची मुलगी नेहा शर्मा लहानपणी आजारपणामुळे अशक्त होती.

Neha Sharma
Neha Sharma Birthday: भागलपूरच्या काँग्रेस आमदाराची मुलगी आहे नेहा शर्मा, लहानपणी झाला होता हा गंभीर आजार 

थोडं पण कामाचं

  • यंगिस्तान, मुबारकां, तुम बिन 2 अशा चित्रपटांमध्ये नेहा शर्माने केले आहे काम
  • भागलपूरच्या काँग्रेस आमदाराची मुलगी नेहा लहानपणी आजारपणामुळे अशक्त होती
  • मात्र आता नेहा आजारपणातून बाहेर आली असून पूर्णपणे तंदुरुस्त आहे

Neha Sharma Birthday: यंगिस्तान (Youngistaan), मुबारकां (Mubarakan), तुम बिन 2 (Tum Bin 2) अशा चित्रपटांमध्ये (films) काम केलेल्या नेहा शर्माचा (Neha Sharma) आज (२१ नोव्हेंबर) वाढदिवस (birthday) आहे. तिचा जन्म १९८७ साली बिहारमध्ये (Bihar) झाला होता. नेहा शर्माचे राजकारणात सक्रीय (politically active family) असलेल्या कुटुंबाशी संबंध (connections) आहेत.

भागलपूरचे आमदार आहेत नेहाचे वडील

नेहा शर्माचे पिता अजित शर्मा हे भागलपूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीतही त्यांनी या मतदारसंघातून ती लढवली होती आणि ते विजयीही झाले होते. आपल्या वडिलांसाठी मते मागण्यासाठी नेहा शर्माही भागलपूरला गेली होती.

लहानपणी या आजारामुळे अशक्त होती नेहा शर्मा

नेहा शर्मा लहानपणी एका आजारामुळे खूप अशक्त होती. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की लहानपणी तिला दम्याचा आजार होता आणि त्यामुळे ती अशक्त होती. पण आता ती या आजारातून पूर्णपणे बाहेर पडली असून तंदुरुस्त आहे.

नेहाची चित्रपटसृष्टीतील कारकिर्द

नेहा शर्माची बहीण आयेशा ही सुद्धा अभिनेत्री आहे आणि ती किंगफिशर कॅलेंडर गर्लही होती. तिने जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते.

नेहा शर्माने २००७मध्ये तेलगू चित्रपट चिरूतामधून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. तिने क्रुक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले ज्यानंतर क्या सूपर कूल है हम, जयंतीभाई की लव्हस्टोरी, यमला पगला दीवाना 2, यंगिस्तान आणि तुम बिन अशा चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

नेहा शर्माने आपले शिक्षण माऊंट कार्मेल स्कूल, भागलपूरमधून पूर्ण केले आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली इथून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. तिला स्वयंपाक करणे, गाणी ऐकणे, वाचणे आणि नृत्य असे छंद आहेत. नेहा शर्मा ही प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगनाही आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी