Bollywood Songs List For New Year Party 2023: मुंबई : नव्या वर्षाची (New Year) सुरुवात रविवार 1 जानेवारी 2022 रोजी होत आहे. नव्या वर्षाचे स्वागत भारतासह (India) जगभर उत्साहाने केले जाते. नवीन वर्षाच्या स्वागताला 31 डिसेंबरच्या दिवशी तुमचा पार्टी प्लान असेल. तुमच्या पार्टीत रंग भरण्यासाठी बॉलिूवूडमधील मसाला गाणे हवेच. नाहीतर तुमची पार्टी ही रंगहीन वाटेल.आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील( Bollywood)अशी काही गाणे सुचवणार आहोत, जे तुमच्या पार्टीची मजा वाढवतील. (New Year 2023: Bollywood Songs List For New Year Party )
अधिक वाचा : Team India : श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये ऋषभ पंतला डच्चू
2022 हे वर्ष जवळजवळ संपत आले आहे आणि आपल्या सर्वांना वर्षातील शेवटचा दिवस पार्टीत घालवायला आवडते. या तुमच्या पार्टीमध्ये काही लोकप्रिय गाणी जे डिजे सॉग्स आहेत, ते गाणे 31 डिसेंबरची पार्टीत तुम्हाला नाचायला भाग पाडतील. यामुळे तुमच्याकडे वर्षातील सर्वोत्कृष्ट गाण्यांची प्लेलिस्ट असायला हवी. काय तुम्हाला ही गाणी आता आठवत नाहीत. काळजी नको आम्ही तुमच्यासाठी या गाण्याची यादी बनवली आहे.
Besharam Rang बेशर्म रंग
बॉलिवूडचा किंग खान पठाण या धमाकेदार चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लवकरच पुनरागमन करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांच्या गाण्यामुळे आणि हॉट डान्समुळे खूप चर्चेत आले आहे. या गाण्यातील दीपिकाचे डान्स मुव्ह्स पाहून तुमच्या मनात लागल्या शिवाय राहत नाही. या गाण्याचे गायक आहेत शिल्पा राव, कारलिसा मोंटेरो, विशाल आणि शेखर.
अधिक वाचा : आजचे राशीभविष्य, बुधवार 28 डिसेंबर 2022चे भविष्य
आपल्या देशाच्या शेजारी देशातील कलाकारांनी हे गाणे सादर केले आहे. जगभरात हे गाणे लोकप्रिय झाले आहे. या गाण्याचे शब्द, धून, संगीतच नाहीतर या गाण्याच्या व्हिडिओने देखील कला क्षेत्रात कहर केला आहे. हे गाणे ऐकल्यानंतर आपण आपले पाय थिरकावल्या शिवाय राहणार नाही यात शंका नाही. अली सेठी हे या गाण्याचे संगीतकार आहेत, तर फजल अब्बास हे सहगीतकार आहेत.
बॉलिवूडची परम सुंदरी असलेली कृती सेनॉन हिने भेडिया चित्रपटातून आपल्याला ठुमकेश्वरीचं दर्शन घडवलं. या गाण्याने अनेकांना नाचायला प्रोत्साहित केले आहे. या गाण्याने नक्कीच तुमच्या पार्टीची मजा वाढेल. या गाण्याचे मुख्य गायक सचिन-जिगर, रश्मीत कौर, अॅश किंग आणि दिव्या कुमार आहेत. सचिन- जिगरने या गाण्याला संगीत दिलं आहे.
अधिक वाचा : जानेवारी 2023 मधील व्रत सण जयंती पुण्यतिथी महत्त्वाचे दिवस
गंगूबाई काठियावाडी हा या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे यात शंका नाही. या चित्रपटातील आलियाचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. या चित्रपटातील मेरी जान गाणे देखील तुम्हाला ठुमके धरण्यास भाग पाडेल. नीती मोहन गायिका असून दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी संगीतकार आहेत.
सर्वांना हार्डी संधूचे "क्या बात है" हे गाणे खूप आवडते आणि आता बॉलिवूडने अधिकृतपणे या गाण्याचा रिमेक बनवला आहे. ओरिजनल गाण्याप्रमाणेच हे गाणे आहे.
झूमे जो पठाण हे पठाण चित्रपटातील बेशरम रंग नंतरचा आणखी एक हिट गाणे आहे. दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान कोणत्याही गाण्यात जीव ओतला आहे. हे गाणे देखील तुमच्या नववर्षाच्या पार्टीचा रंग वाढवण्यात कमी पडणार नाही.
सगळ्यांचा आवडता गायक दिलजीत दोसांझ नेहमी नवीन करमणूक करणारे गाणे आपल्या चाहत्यांना भेट म्हणून देत असतो. बेबे भांगडा पौंडे ने या चित्रपटातील हे गाणे आहे. या पंजाबी गाण्याची मज्जा काही वेगळीच आहे.
जुग जुग जियो या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण या चित्रपटातील काही गाणी उत्तम आहेत. अनिल कपूर, नीतू कपूर, कियारा अडवाणी आणि वरुण धवन यांचा अभिनय अप्रतिम होता.
या वर्षी, दक्षिण आफ्रिकन इंड्रस्टीने काही आश्चर्यकारक हिट्स दिले आहेत, त्यापैकी एक अरबीक कुथू आहे. या गाण्यात थलपथी विजय आणि पूजा हेगडे आहेत. संगीताला भाषेचं बंधन नसते हे या गाण्याने सिद्ध केलं आहे. अनिरुद्ध रविचंदर आणि जोनिता गांधी हे या सुंदर गाण्याचे गायक आहेत. शिवकार्तिकेयन हे गीतकार आहेत आणि अनिरुद्ध रविचंदर या गाण्याचे संगीतकार आहेत.
RRRहा चित्रपट या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात काही अविश्वसनीय गाणी आहेत, ज्यापैकी एक आहे “नाचो नाचो. ” ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी या गाण्यात इतका दमदार परफॉर्मन्स दिला आहे. त्यांच्या परफॉर्मन्सने हे सिद्ध केले की त्यांना दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे स्टार का मानले जाते.
लायगर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही, परंतु चित्रपटातील “आफत” हे गाणे संपूर्ण ब्लॉकबस्टर आहे. हे गाणे तुमच्या पार्टीचा रंग वाढू शकते.