प्रियंका-निकच्या लग्नात दोन्ही मेहुण्यांना पाहा काय दिलं निकनं गिफ्ट, परिणीतीनं केला खुलासा

बी टाऊन
Updated Jun 20, 2019 | 20:43 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोपडानं आपल्या बहिणीच्या लग्नातील एक विशेष घटना सांगितलीय. लग्नात निकचे जोडे लपविल्यानंतर त्यानं परिणीतीच नाही तर सर्व बहिणींना एक विशेष गिफ्ट दिलंय. जाणून घ्या त्याबद्दल...

Nick Jonas, Priyanka Chopra and Pariniti Chopra
प्रियंकाच्या बहिणींना निकनं दिलं लाखोंचं गिफ्ट, जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोपडा सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आलीय. परिणीती बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटासाठी ती खूप मेहनत घेतेय. परिणीती चित्रपटासाठी बॅडमिंटन शिकतेय. नुकतीच तिनं नेहा धुपियाच्या चॅट शो ‘बीएफएफ विथ वोग’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिनं अनेक खुलासे केले.

चॅट शो दरम्यान परिणीतीनं गेल्यावर्षी बहिण प्रियंकाच्या लग्नातील एक किस्सा सांगितला. परिणीतीनं सांगितलं लग्नादरम्यान, जोडे चोरून लपविण्याल्यानंतर त्याबदल्यात निकनं तिला एक डायमंड रिंग दिली होती. परिणीती म्हणते, प्रियंकाच्या लग्नात माझी खूप कमाई झाली. निक जोनासनं फक्त परिणीतीलाच नाही तर प्रियंकाच्या सर्वच बहिणींना डायमंड रिंग दिली. एव्हढंच नव्हे तर डॉलर आणि रुपयांमध्ये लाखो रुपये दिले होते. यासोबतच निकनं आम्हाला बॅग सुद्धा दिल्या होत्या.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The girls

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I’ve always been a sucker for body con dresses @fendi @mytheresa.com

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Royal for the royal wedding @sabyasachiofficial #PCkiShaadi

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

 

परिणीतीनं सांगितलं, ‘ते (निक) आमच्या पेक्षा जास्त तयार होते. मला वाटलं मी सर्वाधिक स्मार्ट आहे पण मी या विधीसाठी त्यांच्याकडून खूप पैसे उकळेल. पण ते पहिलेपासूनच यासाठी तयार होते. जेव्हा आम्ही सर्व बहिणी निकसमोर उभ्या झालो. तेव्हा त्यांनी एका व्यक्तीकडे इशारा केला. त्या व्यक्तीच्या हातात एक मोठा ट्रे होता, ज्यात खूप साऱ्या डायमंड रिंग होत्या. आम्हा सर्व बहिणींना त्यांनी डायमंड रिंग दिली आणि ब्राईड मेडला खूप सारे गिफ्ट्स पण दिले. हे मला सांगून आनंद आणि अभिमान वाटतोय की, माझे जीजाजी उदार आहेत.’

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Before ........ and After! ?? @nehwalsaina HOW DO YOU DO THIS!#SainaNehwalBiopic #Training #ShootsStartsInOctober

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Post training bliss! ? #Saina

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

 

प्रियंका चोपडा आणि निक जोनास यांचं गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न झालं. जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये धुमधडाक्यात लग्न झालं होतं. तीन दिवसांपर्यंत सुरू असलेल्या लग्नविधी हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतींनी लग्न केलं होतं. हे लग्न खूप चर्चेत राहिलं होतं.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर परिणीती चोपडा ऑक्टोबरमध्ये सायना नेहवाल यांच्या बायोपिकचं शूटिंग सुरू करणार आहे. त्यासाठी ती आता बॅडमिंटन खेळणं शिकतेय. याशिवाय परिणीती हॉलिवूड चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’चा रिमेकमध्ये दिसेल. परिणीती ‘जबरिया जोडी’मध्ये सुद्धा दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
प्रियंका-निकच्या लग्नात दोन्ही मेहुण्यांना पाहा काय दिलं निकनं गिफ्ट, परिणीतीनं केला खुलासा Description: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोपडानं आपल्या बहिणीच्या लग्नातील एक विशेष घटना सांगितलीय. लग्नात निकचे जोडे लपविल्यानंतर त्यानं परिणीतीच नाही तर सर्व बहिणींना एक विशेष गिफ्ट दिलंय. जाणून घ्या त्याबद्दल...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola