Ashram 3: आया-बायांनो सावधान! निराला बाबा परतोय, 'आश्रम 3' चा दमदार मोशन Video रिलीज

बी टाऊन
भरत जाधव
Updated May 10, 2022 | 17:35 IST

बॉबी देओलची (Bobby Deol) बहुप्रतिक्षित वेब सीरिज (Web series) 'आश्रम 3' ('Ashram 3') चा मोशन पोस्टर (Motion poster) व्हिडिओ (Video) रिलीज झाला आहे. आपल्या बाबा निरालाच्या (Baba Nirala) दमदार अभिनयाने (Acting) प्रेक्षकांचे (audience) मने जिंकणारा बॉबी देओल परत एकदा बाबा म्हणून परतत आहे.

Motion Video Release of 'Ashram 3'
Ashram 3: आया-बायांनो सावधान! निराला बाबा परतोय, 'आश्रम 3' चा दमदार मोशन Video रिलीज  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बाबा लोकांना आश्रमाशी जोडण्यासाठी कसे प्रवृत्त करतात हे वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे.
  • बॉबी देओलची बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'आश्रम 3' चा मोशन पोस्टर व्हिडिओ रिलीज
  • 'आश्रम 3' वेब सिरीज कधी प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली : बॉबी देओलची (Bobby Deol) बहुप्रतिक्षित वेब सीरिज (Web series) 'आश्रम 3' ('Ashram 3') चा मोशन पोस्टर (Motion poster) व्हिडिओ (Video) रिलीज झाला आहे. आपल्या बाबा निरालाच्या (Baba Nirala) दमदार अभिनयाने (Acting) प्रेक्षकांचे (audience) मने जिंकणारा बॉबी देओल परत एकदा बाबा म्हणून परतत आहे. आश्रम 3 ऱ्या भागातून बाबा निराला आपले निरनिराळे खेळ दाखवण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान प्रदर्शित झालेल्या या मोशन व्हिडिओमध्ये सीझन 3 चा लोगो स्पष्टपणे दिसत आहे. मागील पार्श्वभूमीत आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. हा मोशन व्हिडिओ रिलीज होताच या वेब सीरिजच्या तिसऱ्या भागाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

ईशा गुप्ता आणि बॉबी देओलने शेअर केला व्हिडिओ 

हा मोशन व्हिडिओ ईशा गुप्ता आणि बॉबी देओलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर चाहते सतत या मोशन व्हिडिओवर कमेंट करत आहेत. 

जाणून घ्या 'आश्रम 3' कधी रिलीज होणार

'आश्रम 3' वेब सिरीज कधी प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र हा मोशन व्हिडिओ रिलीज होताच चाहत्यांना आश्रम वेब सीरिजचा तिसरा भाग लवकरच पाहायला मिळणार हे निश्चित आहे.  काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता संदीपने सांगितले होते की, शूटिंग आणि डबिंगचे काम पूर्ण झाले असून लवकरच नवीन सीझन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

बाबा निरालाच्या भूमिकेत बॉबीने जिंकली मने 

या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने साकारलेली बाबा निरालाची भूमिकेनं   तो लोकांच्या मनात घर केलं आहे. या वेब सिरीजची कथा काशीपूर या काल्पनिक शहरावर आधारित आहे. बाबा लोकांना आश्रमाशी जोडण्यासाठी कसे प्रवृत्त करतात हे वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे.  या वेब सिरीजची कथा ड्रग्ज, बलात्कार आणि राजकारणाभोवती फिरते. प्रकाश झा यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये काय घडलं

'आश्रम' वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये बाबांनी पंपी आणि तिच्या कुटुंबियांचा विश्वास जिंकला.  दुसऱ्या सीझनमध्ये बाबाची कृती पम्मी आणि तिच्या कुटुंबियांसमोर आली. मात्र बाबांवर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही. अशा परिस्थितीत आश्रम वेब सिरीजचा तिसरा भाग कोणत्या कथेला वळण घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Esha Gupta (@egupta)

ईशा गुप्ता दिसणार

बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ताही 'आश्रम' वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. अशा परिस्थितीत या वेबसिरीजबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी