Nora Fatehi: नोरा फतेही आणि टेरेंस लुईस एकमेकांच्या प्रेमात? कोरिओग्राफरच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

बी टाऊन
Updated May 04, 2022 | 14:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nora Fatehi In Relationship | सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे, अलीकडेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात अडकले आहेत. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये असलेल्या सेलिब्रिटींची नावे लग्नाच्या यादीत जोडली जात आहेत. सर्वच चाहत्यांना त्यांचे आवडते कलाकार कधी लग्नबंधनात अडकणार याची उत्सुकता लागलेली असते.

Nora Fatehi and dancer Terence Lewis in relationship? 
नोरा फतेही आणि टेरेंस लुईस एकमेकांच्या प्रेमात?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे.
  • नोरा फतेही आणि टेरेंस लुईस यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली आहे.
  • डान्स इंडिया डान्स या रिॲलिटी शोच्या पहिल्या तीन सिझनचा परीक्षक म्हणून टेरेंस ओळखला जातो.

Nora Fatehi In Relationship | मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे, अलीकडेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात अडकले आहेत. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये असलेल्या सेलिब्रिटींची नावे लग्नाच्या यादीत जोडली जात आहेत. सर्वच चाहत्यांना त्यांचे आवडते कलाकार कधी लग्नबंधनात अडकणार याची उत्सुकता लागलेली असते. दरम्यान एकमेकांमध्ये तब्बल १७ वर्षांच्या वयाचे अंतर असूनही एकमेकांच्या हृदयाच्या तारा जुळलेली डान्स क्षेत्रातील लोकप्रिय जोडी म्हणजे टेरेंस लुईस आणि नोरा फतेही. या दोघांचेही नाते आता लपून राहिलेले नाही. (Nora Fatehi and dancer Terence Lewis in relationship?). 

अधिक वाचा : एका आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा- SC

दरम्यान, नोरा फतेही आणि टेरेंस लुईस यांच्याकडून या नात्याची कबुली कधी येते यासाठी सर्वच उत्सुक आहेत. नुकतीच टेरेंसची एक मुलाखत झाली. या मुलाखतीत त्याला नोरासोबतच्या नात्याविषयी विचारले असता, काही गोष्टी गुपित ठेवलेल्याच बऱ्या असं म्हणून त्यांना एका वेगळ्या नात्याचे संकेत दिले आहेत. 

टेरेंसची उत्तम डान्सर म्हणून ओळख 

डान्स इंडिया डान्स या रिॲलिटी शोच्या पहिल्या तीन सिझनचा परीक्षक म्हणून टेरेंस ओळखला जातो. टेरेंस एक उत्तम डान्सर असून त्याच्या कोरिओग्राफी कंपनी भारतासह परदेशातही प्रसिद्ध आहेत. कॅनेडियन मॉडेल नोराने बॉलिवूडमध्ये अभिनय तसेच डान्स आणि मॉडेलिंगमध्ये नाव कमावलं आहे. ही जोडी प्रथम भेटली ती डान्स रिॲलिटी शोमध्ये. लक्षणीय बाब म्हणजे डान्स करताना या दोघांचेही सूर जुळले मात्र प्रत्यक्ष आयुष्यातही त्यांचे नाते नेहमीच रंगलेले पाहायला मिळते. मात्र त्या दोघांनीही याबाबत उघड बोलणे टाळले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

दिले नव्या नात्याचे संकेत 

टेरेंसने सिद्धार्थ कननच्या शोमध्ये हजेरी लावली असता सिद्धार्थ टेरेंसला नोराच्या नात्याविषयी विषयापासून स्वत:ला रोखू शकला नाही. पण टेरेंसने मात्र नोरासोबत डेट करत असल्याची अफवा आहे. आम्ही फक्त मित्र आहोत असे सांगितले. पण मला जे काही मनापासून सांगायच आहे ते मी तुला ऑफ कॅमेरा सांगेन असं बोलून टेरेंसने सर्वांचे लक्ष वेधले आणि सर्व चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी