Nora Fatehi : बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर, नोरा फतेहीची प्रकृती बिघडल्याने अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळली

बी टाऊन
Updated Dec 31, 2021 | 10:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Corona in Bollywood : बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. आता आणखी एक अभिनेत्री कोविड पॉझिटिव्ह आढळली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nora Fatehi's health deteriorates due to corona
नोरा फतेहीला कोरोना, नोराची प्रकृती बिघडली  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नोरा फतेहीला कोरोना झाला
  • कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला
  • चाहते नाराज झाले

Nora Fatehi :  नवी दिल्ली : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीसुद्धा कोरोनाच्या विळख्यात आली आहे. अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या सोशल मीडियावर कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले, त्यानंतर चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली. नोरा फतेहीने सांगितले की, तिची तब्येत खूपच खराब झाली आहे.


नोराची पोस्ट

खुद्द नोरानेच कोरोना असल्याची पुष्टी केली असून ती सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांना संदेश लिहिला आहे, "मी कोरोनाशी लढत असल्याचे म्हटले आहे. कोरोनाने मला चांगलेच ग्रासले आहे. मी बराच काळ अंथरुणावर होते आणि आता 
मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. तुम्ही सर्व सुरक्षित रहा आणि मास्क घाला. हा व्हेरिएंट खूप वेगाने पसरत आहे आणि प्रत्येकावर वेगळ्या प्रकारे परिणाम करत आहे.
दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडली आहे आणि हे कोणालाही होऊ शकते. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेच सर्वात महत्त्वाचे आहे. तुमच्या आरोग्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही."

नोरा गाण्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती

नोरा फतेही गायक गुरु रंधावाच्या 'डान्स मेरी रानी' या नवीन गाण्याच्या व्हिडिओमध्ये दिसली होती.  गाणे आल्यापासून नोरा आणि गुरू त्याचे सतत प्रमोशन करत आहेत. या गाण्याची सर्वत्र चर्चा होत आहे. हे गाणे रिलीज होताच यूट्यूबवर हिट झाले. व्हिडिओची क्रेझ एवढी आहे की, परदेशीही त्याच्या तालावर नाचू लागले आहेत. नोराने तिच्या इंस्टाग्रामवर असे काही व्हिडिओ शेअर केले आहेत.


अभिनेत्रीशी संपर्कात आलेल्यांचीही टेस्ट होणार 

नोरा फतेही तिच्या 'डान्स मेरी रानी' या गाण्याच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शो, सलमान खानच्या 'बिग बॉस 15 वीकेंड के वार', 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या अनेक शोमध्ये दिसली होती. त्यामुळे गुरु रंधावा आणि डान्सरच्या संपर्कात येणाऱ्या स्टार्सचीही कोरोना चाचणी होणार आहे. नोरा फतेहीच्या आधी नुकतेच कपूर घराण्याचे अर्जुन कपूर, रिया कपूर,  अंशुला कपूर सुद्धा कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. अलीकडेच करीना कपूर आणि मलायकाची बहीण अमृता अरोरा कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी