Pushpa Raj : पुष्पा: द राइज रिलीज झाल्यापासून स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ वाढली आहे. आता असे दिसते की, आरआरआर स्टार राम चरण प्रमाणेच, अल्लू अर्जुनने देखील पुष्पा चित्रपटातून गणेशमूर्ती साकारणाऱ्या कलाकारांना प्रेरणा दिली आहे.
अधिक वाचा : जाणून घ्या या सेलिब्रिटींच्या फॅट टू फिट होण्याचे रहस्य
दक्षिणेतील सुपरस्टारसाठी सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वात चांगला काळ दिसत आहे. दक्षिणेतील प्रदर्शित होत असलेल्या बहुतेक कलाकृती रुपेरी पडद्यावर ब्लॉकबस्टर ठरल्या आहेत. या संपूर्ण गोष्टीची सुरुवात 2017 च्या बाहुबली चित्रपटापासून झाली आणि गेल्या दोन वर्षांत राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर आरआरआर तसेच अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा यांसारख्या चित्रपटांनी त्या लोकप्रियतेला वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे.
अधिक वाचा : अभिनेत्री माधवी निमकरचा नऊवारीतील योगा
पुष्पा: द राइज रिलीज झाल्यापासून दक्षिणेकडील नायक अल्लू अर्जुनची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. या चित्रपटाने जनमानसात एक ट्रेंड निर्माण केला आहे ज्यामध्ये प्रत्येकजण केवळ बोलतच नाही तर चित्रपटातील पुष्पा राजची शैली देखील घेत आहे. आता प्रसिद्ध गणपती उत्सव आला असल्याने पुष्पराज स्टाईलचा फिव्हर गणपती मूर्तींनाही डोक्यावर घेताना दिसत होता.
अधिक वाचा : कांजूरमार्ग कारशेड भूखंडाचा वाद अखेर संपला
गणपती उत्सव हा जनतेमध्ये सर्वाधिक साजरा केला जाणारा उत्सव आहे. लोक त्यांच्या जागी गणपतीचे स्वागत करत असताना यावेळी पुष्पराज शैलीत मूर्तींचे आगमन झाले. काही ठिकाणी तर प्रसिद्ध पुष्पराज शैलीत विराजमान असलेल्या गणेशाच्या मूर्ती दिसल्या.
अल्लू अर्जुनच्या क्रेझ आणि स्टारडमचं हे ठळक उदाहरण आहे. एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही स्टायलिश स्टारची क्रेझ कमी होताना दिसत नाही
या वर्षी 31 ऑगस्ट रोजी येणारी गणेश चतुर्थी हा पश्चिम भारतातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी ते गणपतीच्या मूर्ती साकारण्यासाठी विविध ठिकाणांहून प्रेरणा घेतात.