Arjun kapoor New Bike: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मात्र, आता अभिनेत्याच्या नव्या मित्रामुळे मलायका आणि अर्जुनमध्ये फूट पडणार की काय असं वाटतंय.कारण प्रत्येक वीकेंडला अर्जुनला मलायका नव्हे तर या खास मित्राची कंपनी आवडू लागली आहे अलीकडेच या खास मित्रासोबतचे फोटो अर्जुन कपूरने शेअर केले आहेत, जे पाहिल्यानंतर मलाइकाला खूप हेवा वाटू शकतो. अर्जुनचा हा नवा मित्र कोण आहे, ज्याच्यासोबत अभिनेता हँग आउट करणार आहे. हे आता आम्ही तुम्हाला सांगतो.
अर्जुन कपूरचा हा नवा म्हणजे कोणी मुलगी आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर यात अजिबात तथ्य नाही. कारण अर्जुनच्या आयुष्यातील हा नवा मित्र मुलगी नसून त्याची नवीन बाईक आहे. नुकतेच अर्जुन कपूरने त्याच्या नवीन बाईकचे अनेक मोनोक्रोम फोटो शेअर केले आहेत. ज्याद्वारे त्याने आपल्या नवीन मित्राची सर्वांना ओळख करून दिली आहे.
त्याच्या नवीन बाईकचा फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिले - माझ्या नवीन मित्राला भेटण्यासाठी उजवीकडे स्वाइप करा, मी बऱ्याचदा वीकेंडला त्याला भेटण्याचा प्रयत्न करतो.
अर्जुनचे मलायकावर इतके प्रेम आहे की तो तिच्या जागी कोणाचा विचारही करत नाही. त्यांच्या क्यूट लव्हस्टोरीबद्दल सांगायचे झाले, तर अर्जुन कपूर मलायकाचा चाहता आहे.
अरबाजसोबत घटस्फोट होताच मलायकाने अर्जुनसोबतचे नाते अधिकृत केले. ज्याने सर्वांनाच धक्का दिला. खरे तर घटस्फोटानंतर बॉलिवूडमध्ये त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. यानंतर दोघेही एकत्र सुट्टीवर जाऊ लागले. आधी दोघेही हे गुपचूप करत असत, पण नंतर लवकरच त्यांनी सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो शेअर करून प्रेम जाहीर केले.
त्यामुळे आता हा नवा मित्र मलायका आणि अर्जुनच्यामध्ये येत नसून पुढील काही दिवसांमध्ये मलायका आणि अर्जुन बाईक राईड करतना दिसले तर आश्चर्य वाटायला नको.