November OTT Release: 'ब्रह्मास्त्र', 'पोन्नियान सेल्वन'च्या चाहत्यांसाठी खुशखबर, याच महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार हे सिनेमा

बी टाऊन
Updated Oct 31, 2022 | 17:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

November OTT Release: नोव्‍हेंबर महिन्‍यात प्रेक्षकांना ओटीटीवर (November OTT Release)पाहण्यासाठी खूप कंटेट रिलीज होत आहे. या महिन्यात कोणकोणते सिनेमा (movie) आणि वेबसीरिज (Web series)रिलीज होत आहेत ते जाणून घेऊया या रिपोर्टमधून.

November OTT Release big banner big budget film
नोव्हेंबरमध्ये ओटीटीवर रिलीज होणार 'हे' सिनेमा आणि वेबसीरिज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नोव्हेंबरमध्ये ओटीटीवर रिलीज होणार 'हे' सिनेमा आणि वेबसीरिज
  • ब्रह्मास्त्र आणि पोन्नियन सेल्वन नोव्हेंबरमध्ये ओटीटीवर येणार
  • रणबीर कपूर आणि आलियाच्या सिनेमाची क्रेझ

November OTT Release: प्रत्येक महिन्यात ओटीटीवर काही ना काही नवीन रिलीज होत असते. कधी थिएटरमध्ये रिलीज झालेला सिनेमा (movie) ओटीटवर रिलीज होतो. तर कधी एखादी वेबसीरिज (Web series) रिलीज होते. ज्यांना थिएटरमध्ये जावून सिनेमा पाहता आलेला नाही त्यांच्यासाठी ओटीटी हा एक उत्तम पर्याय आहे. नोव्हेंबरमध्ये असे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा ओटीटीवर रिलीज  (November OTT Release) होणार आहेत. कोणते आहेत हे सिनेमा? आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ते पाहता येतील हे जाणून घेऊया. (November OTT Release big banner big budget film )


नोव्हेंबर महिन्याची सुरुवात हॉलिवूड सिनेमा 'द टेकओव्हर'ने होणार आहे


'द टेकओव्हर' हा हॉलिवूड सिनेमा नेटफ्लिक्सवर 1 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. हा सिनेमा इथिकल हॅकरवर आधारित आहे. हा हॅकर एका घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करतो, मात्र, तो स्वत:च एका प्रकरणात अडकतो. 

the takeover


ब्लॉकबस्टर

ब्लॉकबस्टर ही एक कॉमेडी जॉनरची वेबसीरिज आहे. 3 नोव्हेंबरला ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. एका मॅनेजरच्या आयुष्यावर या वेबसीरिजची कथा आधारित आहे. 


बहुप्रतीक्षित ब्रह्मास्त्र याच महिन्यात ओटीटीवर रिलीज होतेय

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र 4 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. डिस्ने हॉटस्टार प्लस हा सिनेमा तुम्हाला पाहता येणार आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने सुमारे 450 कोटींची कमाई केलेली आहे.

 brahmastra

पोन्नियन सेल्वन


साऊथ स्टार डायरेक्टर मणिरत्नम यांचा पोन्नियन सेल्वन हा सिनेमा ३० सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाल करायला येत आहे. पोन्नियन सेल्वन 4 नोव्हेंबरपासून Amazon Prime Video या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवी आणि कीर्ती मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 

PS 1


मोनिका, ओ माय डार्लिंग


हा नेटफ्लिक्सचा ओरिजनल सिनेमा आहे. येत्या 11 तारखेला हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात राज कुमार राव, राधिका आपटे, हुमा कुरेशी, राधिका मदना आणि सिकंदर खेर प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे. 

monica o my darling


तणाव 

ही वेबसीरिज इस्रायलच्या प्रसिद्ध टीव्ही शो फौदाचा हिंदी रिमेक आहे. या वेबसीरिजची कथा काश्मीरमध्ये 2017 साली झालेल्या बॉम्बस्फोटावर आधारित आहे. विशेष म्हणजे या सीरिजमधून अरबाज खान डिजिटल डेब्यू करणार आहे. अरबाज खानशिवाय रजत कपूर, जरीना वहाब आणि मानव विज प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिज 14 नोव्हेंबरला Sony Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी