Pushpa 2 : आता अल्लू अर्जुन एक नव्हे तर दोन खलनायकांशी लढणार, या सुपरस्टारची सिनेमात एन्ट्री

बी टाऊन
Updated Jul 08, 2022 | 16:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pushpa 2 : साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. बातम्यांनुसार, सिक्वलचे म्हणजेच पुष्पा द रुलचे शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे. २०२३ मध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटात अल्लू अर्जुन २-२ खलनायकांशी भिडताना दिसणार आहे.

Now Allu Arjun will fight not one but two villains, the entry of this superstar in the movie
अल्लू अर्जुन आता 2 खलनायकांशी लढणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अल्लू अर्जुन आता 2 खलनायकांना भिडणार
  • विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा
  • पुष्पाच्या दुसऱ्या भागाचं शूटिंग लवकरच सुरू होणार

Pushpa 2 : साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. बातम्यांनुसार, सिक्वलचे म्हणजेच पुष्पा द रुलचे शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे. २०२३ मध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटात अल्लू अर्जुन २-२ खलनायकांशी भिडताना दिसणार आहे.


साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा :द राइज हा चित्रपट डिसेंबर २०२१ मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता आणि 2021 च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. आता चाहत्यांना त्याच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे, ज्यावर सध्या काम सुरू आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे नाव आहे पुष्पा: द रुल. दरम्यान, पुष्पाच्या सिक्वेलची एक बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाच्या सिक्वेलमध्ये अल्लू अर्जुन एक नाही तर 2-2 खलनायकांशी लढताना दिसणार आहे. 
चित्रपट दिग्दर्शक सुकुमार विजय सेतुपतीला चित्रपटात दुसरा खलनायक म्हणून कास्ट करण्याच्या तयारीत आहे.

अधिक वाचा : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावावर दबाव, चांदीही घसरली

फहाद फाजील देखील खलनायकाच्या भूमिकेत आहे, ज्याची झलक चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या क्लायमॅक्समध्ये दिसली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पहिल्या भागासाठी विजयला देखील संपर्क साधण्यात आला होता, परंतु काही घडले नाही.

पुष्पा सिनेमाचा पहिला पार्ट हिट झाला होता

अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा: द राइज खूप हिट ठरला. अल्लू अर्जुनने पुष्पासोबत आपल्या स्टारडमला एका वेगळ्या उंचीवर नेले. रश्मिका मंदान्ना म्हणजेच श्रीवल्ली या चित्रपटातील त्याची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. त्याच वेळी, त्याने चित्रपटातील खलनायक फहाद फासिल म्हणजेच एसपी भंवर सिंह शेखावत यांच्याशीही सामना केला होता.

आता पुष्पा: द रुलमध्ये अल्लू अर्जुनला एक नव्हे तर दोन खलनायकांचा सामना करावा लागणार आहे.फहाद फासिल आधीच चित्रपटाचा एक भाग असताना, आता चित्रपटात एका नवीन खलनायकाची एन्ट्री होत आहे ज्यासाठी दिग्दर्शक सुकुमारने विजय सेतुपतीशी संपर्क साधला आहे.

अधिक वाचा :  हार्ट अॅटॅकपासून रक्षण करणारे १० पदार्थ

विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे

ETimes च्या वृत्तानुसार, विजय सेतुपतीने चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारण्यास होकार दिला आहे. एका सूत्राने सांगितले की, विजयने खलनायकाच्या भूमिकेत या चित्रपटाचा भाग होण्यास होकार दिला आहे. विजयने नेहमीच आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित केले आहे आणि चाहते त्याला अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांच्यासोबत पुष्पा 2 मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर हा चित्रपट २०२३ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी