Vedat Veer Daudale Saat : आता खिलाडी अक्षय साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, फर्स्ट लूक रिलीज

बी टाऊन
भरत जाधव
Updated Nov 03, 2022 | 09:17 IST

अक्षय कुमारने याआधी मराठी सिनेमांची निर्मिती केली आहे. मात्र अक्षय पहिल्यांदा मराठी सिनेमात काम करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल अक्षय कुमार म्हणाला, 'शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ स्वप्न पूर्ण झालं.

Khiladi Akshay will play the role of Chhatrapati Shivaji Maharaj
अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • महेश मांजरेकर यांच्या चित्रपटातून अक्षय कुमारचे मराठीत पदार्पण
  • या चित्रपटात अक्षयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून, फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा करण्यात आली.

मुंबई :  शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) जीवनावर आधारित अनेक सिनेमे (movies)सध्या प्रेक्षकांच्या(audience) भेटीला येत आहेत. नुकताच हरहर महादेव हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला हा चित्रपट मराठी व्यतिरिक्त तेलगू, कन्नाडा, तमिळ , हिंदी या भाषेत प्रदर्शित झाला होता. आता आणखीन एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा पराक्रम दाखवणारा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Now Khiladi Akshay will play the role of Chhatrapati Shivaji Maharaj, first look release)

अधिक वाचा  : वडापावचा वाढणार भाव; सर्वसामान्यांचा हिशोब होणार तिखट

या चित्रपटाचे नाव वेडात मराठी वीर दौडले सात  असे असून याचे दिग्दर्शन महेश मांजरेकर हे करत आहेत.  अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हा आतापर्यंतचा बिग बजेट सिनेमा ठरला आहे. जवळपास 7 वर्ष महेश मांजरेकर या सिनेमावर काम करत आहेत. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमानंतर महेश मांजरेकरांनी अनेक वर्षांनी पुन्हा एकदा महाराजांवर आधारीत सिनेमा आणत आहेत. 2023च्या दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मराठीतील दुसरा बहुभाषिक सिनेमा असून मराठीसह हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.  विशेष म्हणजे या चित्रपटात महाराजांची भूमिका बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार करणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा करण्यात आली. 

अधिक वाचा  : कसा असेल तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस ? वाचा राशीभविष्य

दरम्यान, अक्षय कुमार हा असा एक अभिनेता आहे, ज्याचे दरवर्षी 6 ते 7 चित्रपट प्रदर्शित होतात. अक्षयचा एक चित्रपट प्रदर्शित झाला नाही की दुसर्‍याची घोषणा होते.  या वर्षी (2022) देखील अक्षयचे अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. त्यातला एक चित्रपट सोडला तर दुसरा कोणताच चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला नाही. परंतु अक्षय कुमार या अपयशावर निराश झाला नसून आता मराठी चित्रपट वेडात मराठे वीर दौडले सातमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून हा त्याचा पहिला मराठी चित्रपट असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महेश मांजरेकर यांच्या मेगा-फिल्म वेडात मराठे वीर दौडले सातची 2 नोव्हेंबरला घोषणा करण्यात आली. चित्रपटाच्या लॉन्चिंगला एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्याशिवाय अभिनेता अक्षय कुमारही उपस्थित होता.  या चित्रपटाची पहिली झलक पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा चित्रपट सुपरहिट होणार अशी भविष्यवाणी केली आहे. चित्रपटाच्या घोषणेसोबतच अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फर्स्ट लूकही लाँच करण्यात आला.

अधिक वाचा  : दिघेंच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार? धर्मवीरचा सिक्वेल येणार

अक्षय कुमारने याआधी मराठी सिनेमांची निर्मिती केली आहे. मात्र अक्षय पहिल्यांदा मराठी सिनेमात काम करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल अक्षय कुमार म्हणाला, 'शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ स्वप्न पूर्ण झालं. महाराजांची भूमिका साकारायला मिळणं ही माझी मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करणार आहे'.

या चित्रपटात  हे स्टार्स असणार 

'वेडात मराठे वीर दौड़ले सात' या चित्रपटात अक्षय कुमारशिवाय 'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विशाल हे देखील दिसणार आहेत. या चित्रपटात प्रतापराव गुजर यांची भूमिका लोकप्रिय मराठी अभिनेते प्रवीण तरडे साकारणार आहेत. 

सलमानच्या 'टायगर 3'ला टक्कर देणार

वेडात मराठी वीर दौडले सात या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या  सात वाघ मावळ्यांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक होऊ न देण्यासाठी बहेलोल खानची नियुक्ती करण्यात आली होती. आणि याच बहेलोल खानाची बंदोबस्त करण्यासाठी गेलेल्या सात वाघ मावळ्यांची गोष्ट या चित्रपटात दाखवली जाणार आहे. दरम्यान हा चित्रपट 2023च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे, यावेळी सलमान खान यांचा टायगर 3 हा सिनेमा येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी