Ranveer Nude photoshoot case : न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहने जबाब नोंदवण्यासाठी मागितला 2 आठवड्यांचा वेळ, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बी टाऊन
Updated Aug 21, 2022 | 21:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranveer Nude photoshoot case : न्यूड फोटोशूट प्रकरणी (Nude Photoshoot case) रणवीर सिंगने (Ranveer Singh) आपला जबाब नोंदवण्यासाठी वेळ मागितला होता. मुंबई पोलिसांनी अभिनेत्याविरोधात नोटीस दाखल केली होती. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

Nude photoshoot case Ranveer singh asked 2 weeks to appear on summon
जबाब नोंदवण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ मागितला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणवीर सिंग न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला होता
  • रणवीरने जबाब नोंदवण्यासाठी २ आठवड्यांची मुदत मागितली आहे
  • न्यूड फोटोशूट प्रकरणी अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे.

Ranveer Nude photoshoot case : नुकताच रणवीर सिंग ( Ranveer Singh ) त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे ( Nude photoshoot ) चर्चेत आला होता. या फोटोशूटवरून सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ झाला होता. सोशल मीडियापासून ते रस्त्यांपर्यंत लोकांनी अभिनेत्याला विरोध केला होता. एवढेच नाही तर एका एनजीओने चेंबूर पोलीस ठाण्यात अभिनेत्याविरोधात एफआयआरही दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईतील चेंबूर पोलिसांनी या अभिनेत्याला 22 ऑगस्टला या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. आता रणवीर सिंगने मुंबई पोलिसांच्या या समन्सला उत्तर देताना 2 आठवड्यांचा वेळ मागितला आहे.( Nude photoshoot case Ranveer Singh asked 2 weeks to appear on summon )

अधिक वाचा : झोमॅटोने मागितली माफी, हृतिकची जाहिरात मागे घेतली

न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्याने उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. या प्रकरणात, अभिनेत्याला नवीन नोटीससह नवीन तारीख दिली जाईल. विशेष म्हणजे रणवीर सिंगला मुंबई पोलिसांनी 22 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यासाठी बोलावले होते. अभिनेत्याने पेपर मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले आहे.

रणवीर सिंगला 22 ऑगस्टला आपले म्हणणे नोंदवायचे होते

रणवीर सिंगला समन्स पाठवण्यासाठी मुंबई पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी अभिनेता घरी नव्हता. 16 ऑगस्टपर्यंत मुंबईत पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यानंतर रणवीर सिंगला 22 ऑगस्टला त्याचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते. न्यूड फोटोशूटबाबत सोशल मीडियावर वेगवेगळी मते मांडली जात होती, 
मात्र या प्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीने रणवीर सिंगला खूप पाठिंबा दिला. आलिया भट्ट, आमिर खान, करण जोहर, एकता कपूर, विद्या बालन अशा अनेक कलाकारांचा या यादीत समावेश आहे.
 

अधिक वाचा :  दोन महिला अधिकारी तुरुंगात पडल्या एकाच कैद्याच्या प्रेमात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी