Nusrat Jahan चं बोल्ड फोटोशूट, नेटकरी म्हणाले, ‘खासदार असल्याचं भान ठेवा’

बी टाऊन
भरत जाधव
Updated Dec 09, 2021 | 15:52 IST

पश्चिम बंगालमधील (West Bengal) तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress)च्या खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) या नेहमीच चर्चेत असतात. बंगाली चित्रपटांमधील प्रसिद्ध चेहरा (Bengali actress Nusrat) असणाऱ्या नुसरत या आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) हँडलवर बऱ्याचदा बोल्ड फोटो (Bold photo) पोस्ट करत असतात त्यामुळे त्यांना अनेकवेळा ट्रोल (trolled) देखील केलं जातं.

Nusrat Jahan
फोटो पोस्ट करण्याचा टायमिग चुकल्यानं नुसरत जहां ट्रोल  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • नुसरत जहां यांनी इन्स्टाग्रामवर आपले थ्रो-बॅक फोटो पोस्ट केले होते.
  • बुधवारी देशाचे सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचे तमिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले.
  • फोटो पोस्ट करण्याच्या टायमिंगमुळे ट्रोल झाल्या खासदार नुसरत जहां

कोलकाता  : पश्चिम बंगालमधील (West Bengal) तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress)च्या खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) या नेहमीच चर्चेत असतात. बंगाली चित्रपटांमधील प्रसिद्ध चेहरा (Bengali actress Nusrat) असणाऱ्या नुसरत या आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) हँडलवर बऱ्याचदा बोल्ड फोटो (Bold photo) पोस्ट करत असतात त्यामुळे त्यांना अनेकवेळा ट्रोल (trolled) देखील केलं जातं. बुधवारी सायंकाळीही नुसरत यांनी असेच फोटो पोस्ट केले होते. मात्र, यावेळी त्यांना बोल्ड फोटोंमुळे नव्हे, तर असे फोटो पोस्ट करण्याच्या टायमिंगमुळे ट्रोल करण्यात आले आहे.

बुधवारी देशाचे सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचे तमिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. याच अपघातात त्यांच्या पत्नीदेखील कालवश झाल्या. लष्कराच्या अन्य अधिकारी व जवानांनाही आपले प्राण गमवावे लागले. यामुळे संपूर्ण देश मोठ्या धक्क्यात होता. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी रावत यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. मात्र याचदरम्यान खासदार नुसरत जहां यांनी आपले बोल्ड फोटो पोस्ट केल्यामुळे काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. 'संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असताना असे फोटो पोस्ट करायची गरज काय?', 'किमान तुम्ही खासदार असल्याचं तरी भान ठेवा', अशा आशयाच्या कमेंट्स नुसरत यांच्या फोटोंवर पाहायला मिळाल्या.

नुसरत जहां यांनी इन्स्टाग्रामवर आपले थ्रो-बॅक फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये त्या 'स्पोर्ट्स ब्रा'मध्ये दिसत आहेत. त्यांनी या फोटोंसोबत 'फ्रॉम दि अर्काइव्ह' असं कॅप्शन दिलं आहे. सोबतच त्यांनी थ्रो-बॅक, इन्स्टागॅलरी असे हॅशटॅगही दिले आहेत. कित्येकांनी नुसरत यांना ट्रोल केलं असलं, तरी हे फोटो आवडलेल्या फॅन्सची संख्याही कमी नाही. कितीतरी फॅन्सनी हे फोटो जुने असल्याचं ओळखलं, तसेच कित्येकांनी कमेंट सेक्शनमध्ये हार्ट आणि फायर इमोजी दिले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Nusrat (@nusratchirps)

नुसरत यांच्यासाठी ट्रोलिंग हा प्रकार तसा नवा नाही.  यावर्षी तर त्या मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिल्या. पती निखिल जैनपासून घटस्फोट, अभिनेता यश दासगुप्ता याच्या मुलाला जन्म देणं अशा गोष्टींमुळे त्या कायम हेडलाईन्समध्ये दिसल्या. त्यांच्या पर्सनल लाईफवरुनही त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. मात्र, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या बिनधास्तपणे आपलं आयुष्य जगतात! त्यामुळे बुधवारी पोस्ट केलेल्या फोटोंवर झालेल्या ट्रोलिंगला त्या प्रत्युत्तर किंवा स्पष्टीकरण देतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी