83 Box Office: सोमवारी रणवीर सिंगच्या 83 चित्रपटाने केली इतकी कमाई, जाणून घ्या चार दिवसांचे कलेक्शन

83 Box Office collection:83 ने पुष्पा द राइज आणि स्पायडरमॅन नो वे होम सारख्या चित्रपटांचे आव्हान देखील पेलले आहे जे अजूनही प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. येत्या काळात 83 ची आव्हाने वाढणार आहेत.

83 movie box office collection of 4 days
बॉक्स ऑफिसवर 83 सिनेमाची जादू चालली नाही  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणवीर सिंगच्या बहुचर्चित 83 सिनेमाचे सोमवारचे कलेक्शन निराशाजनक ठरले
  • सिनेमाचे चार दिवसांचे कलेक्शन फक्त 55 कोटी झाले आहे.
  • पुष्पा आणि स्पायडरमॅन नो वे होम सिनेमाचा 83 सिनेमाला फटका बसला आहे.

83 Box Office collection: नवी दिल्ली : रणवीर सिंगच्या 83 चित्रपटाची स्थिती बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली नाही. सुरुवातीच्या वीकेंडलाही म्हणावे तसे कलेक्शन झालेले नाही. सोमवारचे कलेक्शनही निराशाजनकच ठरले. कामकाजाच्या आठवड्याच्या सुरुवातीला चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये घसरण होणे सामान्य आहे, परंतु हा आकडा सिंगल डिजिट असणं ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जात आहे. सोमवारी या चित्रपटाने सुमारे 7 कोटींचा गल्ला जमवला असल्याचा अंदाज ट्रेड तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
अद्याप निर्मात्यांकडून अंतिम आकडे येणे बाकी आहे, त्यानंतर हा आकडा बदलूही शकतो. 

सिनेमाने चार दिवसांत 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, मात्र, पुढचा रस्ता खूपच कठीण दिसत आहे. चित्रपटाचे चार दिवसांचे नेट कलेक्शन 53 कोटी इतके आहे. 
24 डिसेंबर (शुक्रवार) रोजी 83 देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 3741 स्क्रीन्सवर झळकला. हिंदीसह तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झालेल्या 
या सिनेमाने 12.64 कोटींची ओपनिंग केली. शनिवारी, म्हणजेच दुसऱ्या दिवशी सिनेमाने 16.95 कोटींचे कलेक्शन केले, तर रविवारी, चित्रपटाने 17.41 कोटींचे कलेक्शन केले, यासह ओपनिंग वीकेंडचे कलेक्शन 47 कोटींवर गेले. त्याच वेळी, परदेशात झालेल्या कलेक्शन बद्दल सांगायचे झाले तर सिनेमाने तीन दिवसांमध्ये 26.16 कोटींची कमाई केली आहे. 83 चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.79 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.60 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 6.77 कोटींचा गल्ला कमावला.

83 सिनेमसमोर अनेक आव्हाने

83 ने पुष्पा द राइज आणि स्पायडरमॅन नो वे होम सारख्या चित्रपटांचे आव्हान देखील पेलले आहे, जे अजूनही प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. येत्या काळात 83 ची आव्हाने वाढणार आहेत. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा जर्सी हा चित्रपट ३१ जानेवारीला रिलीज होणार आहे. त्याचवेळी ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता 
राज्य सरकारांनी खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अनेक राज्यांमध्ये रात्रीचा कर्फ्यू सुरू झाला आहे, ज्यामुळे शोच्या संख्येवर परिणाम होताना दिसू शकतो. अजूनही अनेक राज्यांमध्ये, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे त्याचाही परिणाम कलेक्शनवर दिसत आहे. 

रजनीकांत यांनी कौतुक केले

समीक्षकांच्या 83 ला चांगली पावती दिली आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या चित्रपटाचे कौतुक केले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे समर्थन केले आहे.
मंगळवारी थलैवा रजनीकांत यांनी 83 चे कौतुक करणारे ट्विट केले. संपूर्ण टीमचे अभिनंदन करताना रजनीकांत यांनी लिहिले - व्वा. काय चित्रपट आहे... विलक्षण!

कबीर खान दिग्दर्शित, 83 हा 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्या विश्वचषक विजयावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर दीपिका पदुकोण रोमी देवच्या भूमिकेत असून ती या चित्रपटाची सहनिर्माती देखील आहे. चित्रपटातील दिग्गज खेळाडूंची पात्रे अनेक दिग्गज कलाकारांनी साकारली आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी